Dharangaon: Chief Executive Officer Dr. Pankaj Asia esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्हा परिषद CEOनी घेतला विद्यार्थ्यांचा वर्ग

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२) राबविण्यात आलेल्या पालक संपर्क अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्वत: शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले.

हे अभियान राबविण्यात येत असून, त्यासाठी सीईओ डॉ. आशिया यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि तालुका स्तरीय यंत्रणेने कमी गुणवत्ता असणाऱ्या शाळांना भेटी दिल्या.

यात सीईओंनी धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव आणि अमळनेर तालुक्यातील सुंदरपट्टी या जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांचा वर्ग घेत गुणवत्तेची पाहणी केली. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती व गुणवत्ता कमी आढळून आली. ( Zilla Parishad CEO took class of students Jalgaon News)

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

शिक्षक, गटविकासाधिकाऱ्यांना इशारा

येथील शिक्षकांना गटविकासाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या समक्ष गुणवत्ता एक महिन्याच्या सुधारण्याचे आणि उपस्थिती वाढविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, यात वाढ न झाल्यास येथील शिक्षकांवर आणि त्या तालुक्यातील पर्यवेक्षीय यंत्रणेवर कारवाई करण्याचा इशारा डॉ. आशिया यांनी दिला.

गुरुवारी शाळा भेटीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी धरणगाव आणि अमळनेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. मोहन यांनी, चोपडा तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे यांनी जामनेर तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. सर्व विभागप्रमुखांनी त्या- त्या तालुक्यांत भेटी देऊन विद्यार्थ्यांशी, पालकांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Visit : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; मुख्यमंत्र्यांना पत्रानंतर आता पुण्यातील उपोषणस्थळी देणार भेट

Dry Fruits Price: रक्षाबंधन, गणेशोत्सवाआधी खिशाला मोठा फटका! कांदा-साखर कमी होती की काय, आता ड्रायफ्रूट्सही महागले, वाचा नवे दर...

कोल्हापुरात ‘होम मिनिस्टर’चा डंका! २,५०० हून अधिक महिलांनी औक्षण करत रचला विश्वविक्रम

Marathi News Live Updates : राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

SCROLL FOR NEXT