elections
elections Esakal
जळगाव

Jalgaon : प्रभागांच्या तोडफोडीमुळे अनेकांची गोची

चंद्रकांत चौधरी

पाचोरा : तालुक्यातील जिल्हा परिषदेचे (ZP) गट, पंचायत समितीचे (Panchayat Samiti) गण व पालिकेच्या (Municipal) प्रभागांची (Wards) तोडफोड झाल्याने तसेच त्यात वाढ झाल्याने अनेकांची गोची झाली आहे. काहींना ही तोडफोड फायदेशीर ठरणारी आहे तर काहींना अडचणीची ठरली आहे. त्यामुळे ‘कही खुशी, कही गम’चे चित्र दिसत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय ढगांचा गडगडाट वाढला आहे. (Zilla Parishad group Panchayat Samiti groups municipal wards formation Jalgaon News)

पाचोरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे १० गण होते. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने (BJP) दोन व शिवसेनेने (Shiv sena) तीन गटात सत्ता मिळवली होती. राष्ट्रवादीला (NCP) एकाही गटात यश मिळाले नव्हते. मात्र, पंचायत समितीच्या बांबरुड, खडकदेवळा व नगरदेवळा या तीन गणांत राष्ट्रवादीने बाजी मारली होती. कुरंगी, लोहारा, पिंपळगाव, लोहटार व बाळद या पाच गणांत भाजपची तर कुऱ्हाड गणात शिवसेनेची आणि शिंदाड गणात काँग्रेसची सत्ता प्रस्थापित झाली होती. पंचायत समितीत भाजपने काँग्रेसच्या एका सदस्याची मदत घेऊन सभापतीपद मिळवले होते, जे आजतागायत कायम आहे.

गटासह दोन गण वाढले

नव्याने पुनर्रचनेत जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. यामुळे पिंपळगाव- शिंदाड व लोहटार-खडकदेवळा या दोन जिल्हा परिषदेच्या गटांची तोडफोड झाली असून वरखेडी- पिंपळगाव व शिंदाड- जारगाव हे दोन गट नव्याने तयार झाले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे ६ गट व पंचायत समितीचे १२ गण झाले आहेत. लोहटार- तारखेडा खुर्द या गटात सर्वाधिक २५ गावे असून वरखेडी- पिंपळगाव गटात सर्वांत कमी १६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. काही इच्छुकांना व आजी- माजी पदाधिकाऱ्यांना आता आपले गट, गण बदलावे लागणार आहेत. त्यादृष्टीने इच्छुकांकडून गावांचे दौरे केले जात असल्याने राजकीय वातावरण तापत असल्याचे चित्र आहे.

पालिकेचा प्रभाग वाढला नगरपालिकेच्या प्रभागांमध्येही तोडफोड झाली असून यावेळी एक प्रभाग वाढला आहे. २०१६ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व जनाधार विकास आघाडी यांच्यात चुरशीच्या लढती रंगल्या होत्या. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह शिवसेनेने ११ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, जनाधार विकास आघाडीने ६ व भाजपने २ जागा जिंकल्या होत्या. दरम्यानच्या काळात अमोल शिंदे यांनी राजीनामा दिल्याने प्रभाग ६ ची पोटनिवडणूक होऊन त्यात राष्ट्रवादीचे भूषण वाघ हे विजयी झाल्याने राष्ट्रवादीची सदस्य संख्या वाढली होती. आतापर्यंत १३ प्रभागातून २६ सदस्य निवडले जात होते. आता एक प्रभाग वाढून १४ प्रभाग झाल्याने २८ सदस्य निवडले जाणार आहेत. प्रभागांच्या सोडतीमुळे काहींना आपला प्रभाग बदलावा लागणार आहे.

पालिका निवडणुकीसाठी आमदार किशोर पाटील, मुकूंद बिल्दीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ, भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, सतीश शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, ‘मनसे’चे फईम शेख, वंचित आघाडीचे विशाल बागूल आदी पदाधिकारी सज्ज झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT