jalgaon  sakal
जळगाव

जळगाव : २८० फूट संडे-१ सुळका केला सर

जळगावच्‍या प्रदीप बारी व टीमची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा आणि शिखर गाठण्यासाठी नेढ्यातून मार्ग काढावा लागणारा २८० फुटी संडे- १ सुळका(sunday -1) टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप बारी व त्याच्या सहकारी गिर्यारोहकांनी सर केला.सदर मोहिमेची सुरवात पेगलवाडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथून झाली. दीड तासांचा खड्या चढाईचा मार्ग सुळक्याच्या पायथ्याला घेऊन जातो. आरोहणासाठी सुमारे एक तास लागतो. हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून आरोहण करावे लागते. पहिला सरळसोट ९० अंशातील ६० फुटी टप्पा पार केल्यावर एक १५ फुट ट्रॅवर्स मारल्यावर येणारा ओव्हरहँगचा टप्पा शारीरिक कसोटी पाहणारा आहे. तर पुढचा ४५ फुटी सोप्पा टप्पा पार केल्यावर शारीरिक कस लागणारा १२० फुटी टप्पा पार केल्यावर नेढ्यातून मार्ग काढून अखेरचा ३५ फुटी टप्पा पार केल्यावर शिखर गाठता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा ९० अंशातील सरळसोट चढाई, ओव्हरहँगचा खडतर मार्ग, निसरड्या पाऊलवाटेच्या शेजारी असणारी खोल दरी, पाण्याची कमतरता असलेला दुर्गम परिसर अशा सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सचे चेतन शिंदे आणि जॉकी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप बारी, स्वप्नील सोनवणे, माधव गोसावी, डॉ. समीर भिसे, ज्ञानो ठाकरे, सर्वेश भावसार, रोहित आदी गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT