SBI RECRUITMENT 2023
SBI RECRUITMENT 2023  esakal
Jobs

SBI RECRUITMENT 2023 : गुड न्यूज! स्टेट बँकेत बंपर भर्ती, परीक्षा नाहीच; थेट इंटरव्ह्यू अन् जॉइनिंग

साक्षी राऊत

SBI RECRUITMENT 2023 : सेंट्रल रिक्रूटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट (सीआरपीडी), कॉर्पोरेट सेंटर, मुंबई, स्टेट बँक ऑफ इंडियाने सेवानिवृत्त अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे तात्कालिन असोसिएट्स (e-ABS) आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांनी बँकेच्या कोणत्या शाखेसाठी आणि कोणत्या पदासाठी जागा निघाल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी SBI भर्ती 2023चे अधिकृत नोटिफिकेशन चेक करावे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज प्रक्रियेत सामील होण्यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत नोंदणी करू शकतात. या संदर्भात, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 1 एप्रिल रोजी जाहिरात (No.CRPD/RS/2023-24/02) जारी केली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

अशाप्रकारे होईल उमेदवारांची निवड

मुलाखतीच्या आधारे स्टेट बँकेत भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी, प्रथम प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी केल्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. 100 गुणांसाठी मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल. (Recruitment)

स्टेट बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांसाठी अर्ज करू शकतात. एकूण पदांची संख्या 1022 आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी, ही भरती SBI द्वारे Anytime चॅनेल अंतर्गत कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

हे लक्षात घ्या

विशेष बाब म्हणजे तरुण उमेदवार अर्ज प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. या पदांसाठी फक्त SBI किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेतील निवृत्त कर्मचारी अर्ज करू शकतात. (Job)

इतका पगार मिळेल

01) चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर - एनीटाइम चॅनल (CMF-AC): दर महिना रु.36000/-

०२) चॅनल व्यवस्थापक पर्यवेक्षक - एनीटाइम चॅनेल (CMS-AC): दर महिना रु. 41000/-

०३) सपोर्ट ऑफिसर - एनीटाइम चॅनेल (SO-AC): दर महिना रु. 41000/-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT