Ananya-Parekh 
काही सुखद

अर्थभानातून उद्योगवाटेकडे

अनन्या पारेख

आर्थिक साक्षरता हा उन्नतीकडे नेणारा रस्ता असल्याचं मानून अनन्या पारेख या तरुण मुलीनं काम सुरू केलं आणि यातूनच प्रवास सुरू झाला तो ‘इनर गॉडेस’ नावाच्या स्टार्टअपचा. ही स्टार्टअप वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेते; महिलांना, मुलींना माहिती देते. स्थापना झाल्यापासून केवळ चार वर्षांत या स्टार्टअपच्या कामामुळे दहा हजार महिलांचं आयुष्य बदलून गेलं आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आर्थिक बाबींबाबत एकूणच जाणीव कमी असताना अल्प उत्पन्न गटांतल्या मुलींमध्ये आणि महिलांमध्ये तर ते कमीच असणार. मात्र, आर्थिक साक्षरता हा उन्नतीकडे नेणारा रस्ता असल्याचं मानून एका तरुण मुलीनं काम सुरू केलं. फक्त नुसता उद्योग न उभारता सामाजिक बदल घडवणारं काहीतरी करावं यातून तिनं काम करायला सुरुवात केली आणि यातूनच प्रवास सुरू झाला तो ‘इनर गॉडेस’ नावाच्या स्टार्टअपचा. चेन्नईतली ही स्टार्टअप तिच्या वेगळेपणामुळे हळूहळू प्रसिद्ध होऊ लागली आहे आणि या स्टार्टअपमागचं नाव आहे अनन्या पारेख हिचं. केवळ २४ वर्षांची अनन्या या कंपनीची सहसंस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

अनन्या स्वतः एकत्र कुटुंबातली आणि संपन्न घरातली. मात्र, घरात संवाद होता, सामाजिक भान देणारी मंडळी होती. त्यातून तिच्या सामाजिक विचारांचं बीज रोवलं गेलं. अनन्याला प्रेरणा मिळाली ती खरं तर तिच्या घराजवळच्या एका बालगृहामुळे. अनन्या तिथं मदत करायला अनेक वेळा जायची. अनेकांकडून देणग्या गोळा करून त्या संस्थेला द्यायची. त्यातून हळूहळू सुरुवात होत गेली आणि ‘इनर गॉडेस’ची निर्मिती झाली. अनन्याचा स्वतःचा महिलांचे प्रश्न, लिंगभेद, मानसिक आरोग्य, गुंतवणूक, आर्थिक चिंता अशा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास आहे. तिनं या विषयावर खूप पुस्तकंही वाचली. त्यातून मग ‘इनर गॉडेस’च्या कामाची दिशाही तयार होत गेली. ही संस्था वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेते; महिलांना, मुलींना माहिती देते. स्थापना झाल्यापासून केवळ चार वर्षांत या स्टार्टअपच्या कामामुळे दहा हजार महिलांचं आयुष्य बदलून गेलं आहे. अनन्यानं या कामात तन्वी गिरोत्रा यांचंही मार्गदर्शन घेतलं. त्यामुळे ‘इनर गॉडेस’ला आणखी व्यापक रूप मिळालं.

‘इनर गॉडेस’ महिला सबलीकरणापासून शिक्षणापर्यंत अनेक गोष्टींवर सध्या काम करत असली, तरी अनन्यानं त्यातलं अर्थभान वाढवण्याचं काम स्वतःकडे घेतलं आहे. तिनं १६ ते २५ या वयोगटातल्या मुली आणि महिलांवर लक्ष केंद्रित केलं आहे. या वयोगटातल्या आणि अल्पोत्पन्न असलेल्या ज्या महिला आणि मुली आर्थिक सवयींबाबत जागरूक नसतात, त्यांना त्या सवयींची जाणीव करून देण्याचं काम अनन्या करते. तरुण मुलींमधल्या अनेक प्रश्नांचं मूळ आर्थिक स्वातंत्र्य नसण्यात आहे, हे अनन्याचं निरीक्षण आहे. त्यामुळे ही छोटी गोष्ट केली, तर अनेक समस्या सुटू शकतात, या भावनेनं ती काम करते आहे. अर्थभान वाढवण्याचं हे काम सामाजिक चळवळ झालं पाहिजे, असं तिला वाटतं. त्यातून हा विषय अभ्यासक्रमातही समाविष्ट करावा, अशी मागणी ती ‘इनर गॉडेस’तर्फे करणार आहे.... एकूण, अर्थ या विषयावर काम करताकरता अनन्याला जीवनाचाही अर्थ कळला आहे आणि त्यावरच तिची वाटचाल सुरू आहे.

अनेक महिला खूप लहान वयात पतीच्या मृत्यूमुळे किंवा तो सोडून गेल्यामुळे एकट्या पडतात आणि पैशांचं काय करायचं, हे त्यांना कळत नाही. आर्थिक व्यवस्थापन हे शाळा-कॉलेजांमध्ये तशा अर्थानं शिकवलं जात नाही. त्यामुळे लहान वयातच अर्थभान निर्माण केलं, तर दीर्घकालीनदृष्ट्या विचार करता मुलींना, महिलांना नंतर खूप उपयोग होतो.
- अनन्या पारेख, सीईओ, इनर गॉडेस

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT