काही सुखद

"हरपल आपके साथ'! एलआयसी देणार मतिमंद मुलांच्या शाळेस स्कूल बस

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : "जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी' नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी धडपडणारे व नागरिकांची आर्थिक स्थिती कायम मजबूत राहावी, यासाठी "हरपल आपके साथ' हे आश्‍वासन सार्थ ठरवत भारतीय आयुर्विमा महामंडळ सामाजिक बांधिलकीही जपत आहे. मतिमंद मुलांना शिक्षण घेणे सुसह्य व्हावे, यासाठी येथील आशा भवन मतिमंद मुलांच्या शाळेला चक्क लाखो रुपयांची "स्कूल बस' भेट देणार आहे.
 
विम्याच्या माध्यमातून भारतीय आयुर्विमा महामंडळ नागरिकांच्या एकूणच जीवनाची काळजी घेते. तद्वत महामंडळ सातत्याने सामाजिक बांधिलकी जपते. विशेषतः शाळांना, सामाजिक संस्थांनाही मदत करण्यात भारतीय आयुर्विमा महामंडळ आघाडीवर असते. कोयना खोऱ्यातील शिरवली, आपटी येथील शाळांच्या इमारती बांधून दिल्या आहेत, तर साताऱ्यातील समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मूकबधीर आणि मतिमंद शाळेतील मुलांसाठीही त्यांनी स्कूल बस दिली आहे.

कुत्र्यांच्या भुंकण्याने पाटील कुटुंबिय जागे झाले, पाहतात तर काय ? बिबट्या दारात
 
कोडोली येथे आशा भवन मतिमंद शाळा आहे. या शाळेत शेकडो मुलांना निःस्वार्थीपणे, कोणतेही शुल्क न आकारता शिक्षण दिले जाते. त्यामधील काही मुले एक पालकत्व, अनाथही आहेत, तसेच साताऱ्याच्या परिसरातील मतिमंद मुलेही या शाळेत शिक्षण घेतात. परिसरातील मुलांना शाळेपर्यंत आणण्यात मोठी अडचण येते. मुलांना शाळेत येणे- जाणे सुलभ व्हावे, यासाठी या शाळेला वाहनाची गरज होती. आशा भवनच्या वतीने भारतीय आयुर्विमा महामंडळाला एखादे वाहन देण्याची विनंती केली होती. तसा प्रस्तावही दिला होता. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव नुकताच मान्य केला. आशा भवनसाठी स्कूल बस मंजूर केली आहे. लाखो रुपये किमतीची बस आता शुक्रवारी (ता. 25) येथील मुख्य कार्यालयात दुपारी एक वाजता होणाऱ्या कार्यक्रमात आशा भवनला दिली जाणार असल्याची माहिती भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या येथील अधिकाऱ्यांनी दिली. त्या वेळी झोनल मॅनेजर सी. विकास राव, वरिष्ठ विभागीय प्रबंधक ललितकुमार वर्मा आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT