Jahangir Ansari 
काही सुखद

अधू हाताने अन्सारी ओढतात संसाराचा गाडा

नीलेश डाखोरे

नागपूर - कोलकात्याच्या मुस्लिम कुटुंबात १९७५ मध्ये गोंडस बाळाने जन्म घेतला. बाळ जन्मजात धष्टपुष्ट होते. मात्र, पाचव्या वर्षी मुलाच्या एका हाताला पोलिओ झाला. आई-वडिलांनी बाळ बरे व्हावे म्हणून १४ वर्षे विविध उपचार केले. परंतु, पोलिओने प्रभावित झालेला हात सामान्य झाला नाही. अशा स्थितीत वडिलांच्या गॅरेजमध्ये काम करून अन्सारी यांनी आयुष्याचे ‘ॲन्सर’ शोधण्याचा प्रयत्न केला. मानवी आयुष्य हे एकदाच मिळालेली जहागिरी मानणाऱ्या त्या तरुणाचे नाव आहे जहागीर कादीर अन्सारी. 

मूळचे बंगाली असेलेले जहागीर अन्सारी तसे अशिक्षितच. मदरशात शिक्षक घेत असताना तीनदा नापास झाल्याने शिक्षण सोडले; परंतु संघर्ष करण्याची जिद्द सोडली नाही. अशिक्षित असल्याने कोलकात्यातील वडिलांच्या गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. अशातच १९९७ मध्ये त्यांनी सहकुटुंब नागपूर गाठले. संसाराचा गाडा हाकण्यासाठी वडिलांनी वाडीजवळील वडधामना येथे गॅरेज थाटले. परंतु, त्यांचे वडिलांसोबत काम करताना मन रमले नाही. जहागीर यांनी मित्राच्या मदतीने २००३ मध्ये चिंचभवन येथील एबीएम कंपनीत नोकरी सुरू केली. २०१२ मध्ये ती नोकरीही सोडली. यानंतर लातूर व नंतर जयपूर येथे फुटपाथवर गॅरेजचे दुकान टाकले. पण तिथेही मन रमले नाही. न राहवून त्यांनी परत नागपूर गाठले.

अन्सारी यांनी सोमलवाडा, बेलतरोडी रोड, मनीषनगर येथील वर्दळीच्या रस्त्यावर गाडी दुरुस्तीचे दुकान टाकून व्यवसाय सुरू केला. एका हाताने अधू असल्याने दुकानात आलेल्यांना ते कामाचे दिव्य कसे पार पाडतील, असा प्रश्‍न पडायचा आणि आजही पडतो. मात्र, दिव्यांगत्वावर मात करीत ते दुकान चालवीत आहेत. त्यांना या कामी मुलांचीही साथ मिळतेय. 

मोठे वाहन दुरुस्ती करणे सोपे
सायकल व दुचाकी वाहने दुरुस्त करताना त्रास होतो. कारण, वाहन सतत हलत असते. याउलट चारचाकी व मोठे वाहन दुरुस्त करणे अधिक सोपे असते. पाना लावून नट खोलायचे. नट काढताच एका हाताने चाक खाली पाडायचे. चाक ढकलत नेत दुरुस्त करून लावणे सोपे असल्याचे जहागीर अन्सारी म्हणाले.

एका हाताने अधू असल्यामुळे वाहन दुरुस्तीसाठी येणारे वाहनधारक सुरुवातीला ‘आप काम कैसे करोगे?’ असा प्रश्‍न करतात. मात्र, काम होताच आश्‍चर्यचकित होऊन स्तुती करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो.
- जहागीर अन्सारी,  फुटपाथ, गॅरेज दुकानदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT