काही सुखद

पसायदानातून कैद्यांचे प्रबोधन 

रवींद्र जगधने

पिंपरी - जन्मतःच कोणी गुन्हेगार नसते, परिस्थिती माणसाला गुन्हेगार बनवते. मात्र, त्यांचे मन परिवर्तन झाल्यास तेही सुखी आयुष्य जगू शकतात. या विश्‍वासाने निगडीतील भूलतज्ज्ञ डॉ. संदीप बाहेती हे महाराष्ट्रातील विविध कारागृहात जाऊन प्रबोधन करत आहेत. 

डॉ. बाहेती "आकाश भरारी' या पसायदानावरील कार्यक्रमाअंतर्गत कैद्यांना प्रेरणा व अहिंसा-प्रेम, सर्वधर्म समभाव, सकारात्मकता, शांतीचा संदेश देतात. एखादी गोष्ट अयोग्य असल्याचे माहिती असूनही आपल्याकडून का घडते. या संदर्भात ते ज्ञानेश्वरीतील "नीती धर्माशी शेज करी' या ओळीचा संदर्भ देऊन ते कारागृहातील कैद्यांना मार्गदर्शन करतात. आत्तापर्यंत येरवडा, धुळे, जळगाव, नगर, नाशिक आदी मध्यवर्ती कारागृहात पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या प्रेरणा कार्यक्रमाअंतर्गत व समर्थ शांतिदूत परिवाराच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. 

निसर्गाचे महत्त्व, जगा व जगू द्या या तत्त्वाचा अवलंब, वृक्षसंवर्धन व जोपासना करण्यासाठीही ते कार्य करतात. विविध लेखाच्या माध्यमातून, तसेच वृक्ष व निसर्ग संवर्धनासाठी जागृती करतात. बंद पडलेले हृदय सुरू करण्याचे जनजागृतीपर कार्यक्रम आणि प्रात्यक्षिक व अर्धांग वायूचा झटका आल्यानंतर वेळेत पाऊल उचलल्यास रुग्ण पूर्ववत होऊ शकतो, याचे प्रबोधनही ते करतात. या बाबतचा उपक्रम इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्थेशिया पिंपरी-चिंचवड शाखा घेते. 1996 च्या भूलतज्ज्ञांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांच्या शोध निबंधास प्रथम पारितोषिक मिळाले. डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातही ते अध्यापन करतात. समाजकार्यासाठी महेश प्रोफेशनल फोरमची स्थापना केली आहे. 

कार्यक्रमांतून कैद्यांमध्ये झालेला सकारात्मक बदल बघून पसायदान ही जगातील सर्वोत्कृष्ट प्रार्थना व तिचे सामर्थ्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याचा मानस आहे. तसेच, झाडांबद्दल माहितीपर माझ्या पुस्तकाचे वाटप करणार आहे. 
- डॉ. संदीप बाहेती, भूलतज्ज्ञ व प्रवचनकार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT