काही सुखद

ऑनलाइन शिक्षणासाठी दहा विद्यार्थ्यांना 'रोटरी' तर्फे मोबाईल भेट

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा)  : पाचगणी रोटरी क्‍लबने आदिती गोराडिया यांच्या सहकार्यातून महात्मा फुले विद्यालयातील दहा गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल भेट देवून ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत सहभागी करण्यास मोलाची भूमिका बजावली आहे. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर उपस्थित होते,तर अध्यक्षस्थानी रोटरी क्‍लबचे अध्यक्ष किरण पवार होते. या वेळी सचिव शिवाजी शिंदे, रोटरी सदस्य निहाल बागवान, शहराम जवांमर्दी, जयवंत भिलारे, भारत पुरोहित, अली असगर शेववाला, भूषण बोधे, अमित भिलारे, सुनील धनावडे, राजेंद्र पारठे, मुराद खान, अमित बोधे, विशाल रांजणे, सुनील कांबळे, महात्मा फुले विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री. फरांदे, मानाजी शिंदे, योगेश शेरे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

कोविडच्या लढ्यात जननी ठरतेय आधारवड!
 
पाचगणी येथे महात्मा फुले विद्यामंदिरामध्ये दीन-दलितांची गरीब मुले शिक्षण घेत आहेत तसेच गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाईलअभावी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर रोटरी क्‍लबच्या वतीने या विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष किरण पवार यांनी सांगितली.

आमदारांच्या एका हाकेत उद्योगपतीने दिली लाखांची रेमडिसिव्हर इंजेक्‍शन्स

यावेळी श्री. दापकेकर म्हणाले, ""गोरगरीब मुलांच्या आयुष्यातील ज्ञानगंगा अखंड प्रवाहात आणण्यासाठी रोटरी क्‍लबने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. सध्या कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेला महत्त्व आले असून, यापासून आपल्या विभागातील कुणीही वंचित राहू नये यासाठी रोटरीने पुढाकार घ्यावा.'' जयवंत भिलारे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.

साक्षे.. साक्षे...! शिक्षणासाठी आत्महत्या केलेल्या साक्षीच्या आईचा हंबरडा व्यवस्थेला चपराक

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री घायवळ गँगचा धुमाकूळ; गोळीबारात एक जण गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माेठी बातमी! 'शिरवळमध्ये भरदिवसा गाेळीबार'; घटना सीसीटीव्‍हीत कैद, तिघांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ, नेमकं काय घडलं..

Chh. Sambhajinagar Accident : माळीवाडा पुलावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य

सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘या’ लाखो लोकांचे जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार आणि पोलिसांकडून दाखले जप्त होणार, नेमका आदेश काय?, वाचा...

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

SCROLL FOR NEXT