Satara Latest Marathi News 
काही सुखद

दुर्गम डोंगरी भागातील पाठरवाडी झाले 'अंधमुक्त'; 'रोटरी'च्या प्रयत्नांना अखेर यश

जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) : तांबवेनजीक गमेवाडीजवळ असलेले अत्यंत दुर्गम डोंगरी विभागातील गाव म्हणून ओळख असलेले पाठरवाडी (ता. कऱ्हाड) कऱ्हाडच्या रोटरी क्‍लबच्या प्रयत्नातून अंधमुक्त झाले. 

पाठरवाडी हे अत्यंत दुर्गम भागात असून खडतर रस्ते, डोगरांत उंचीवर असलेल्या या गावात साधारणत: 300 ते 350 लोकसंख्या आहे. येथे ये-जा करताना व मानवी सुविधा पुरवताना प्रशासनासह ग्रामस्थांची मोठी पंचायत होते. अशाच दुर्गम भागात कऱ्हाड रोटरी क्‍लबने सामाजिक बांधिलकीतून गाव अंधमुक्त करण्याची तयारी सुरू केली. त्यानुसार रोटरी क्‍लबचे अध्यक्ष गजानन माने, सचिव डॉ. शेखर कोगनुळकर, रोटरियन व माजी अध्यक्ष नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. राहुल फासे यांनी पुढाकार घेऊन नेत्र शिबिर आयोजित केले. तेव्हा गावातील लोकांची नेत्रतपासणी केली. त्यात चार रुग्ण मोतिबिंदू बाधित असल्याचे दिसून आले. 

त्यानुसार "रोटरी'ने तातडीने नेत्रशस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले. मंगळवारी सर्व नेत्ररुग्णांना स्वखर्चाने वाहनातून रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी कऱ्हाडात डॉ. राहुल फासे यांच्या नेत्ररुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी दिली. "रोटरी'चे रोटरियन राजेश खराटे, किरण जाधव, जगदीश वाघ, चंद्रकुमार डांगे, प्रबोध पुरोहित, सचिव डॉ. शेखर कोगनुळकर, अध्यक्ष गजानन माने यांच्यासह 63 सदस्यांनी गाव अंधमुक्त केले. "रोटरी'च्या सेवाभावी वृत्तीबद्दल पाठरवाडी ग्रामस्थांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT