काही सुखद

झाडे लावून झाडांचा वाढदिवस 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद -  आषाढीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात पोचत होत्या; तर दुसरीकडे ‘मैत्र ऑक्‍सिजन हब’च्या वन पंढरीत ‘वृक्षच आमचा विठोबा, वृक्षच आमची विठाई’ अशी खूणगाठ बांधत, वृक्ष वारकरी वृक्षारोपणात तल्लीन झाले होते. आषाढीच्या दिवशी गतवर्षी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस या वारकऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने पर्यावरणाचा संदेश देत, जल्लोषात साजरा केला.  

‘मैत्र ऑक्‍सिजन हब’च्या वन पंढरीत लहानथोरांचा अमाप उत्साह होता, घन वनाबद्दल मनात उत्सुकता होती, कुणी वृक्ष घेऊन येते, कुणी खड्डे करीत होते; तर कुणी वृक्षलागवड करीत होते. कुणी लावलेल्या वृक्षांना पाणी देत होते. गतवर्षी आषाढीच्या मुहूर्तावर मित्रपरिवाराच्या मदतीने घनवन उभारले. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त वृक्ष लावून वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय वृक्ष वारकऱ्यांनी घेतला होता. त्यानुसार हा उपक्रम घेण्यात आला. वृक्षांसाठी वृक्षांपेक्षा इतर कोणतीही भेट अमूल्य असूच शकत नाही. वृक्षांना भावना असतात, वृक्षांना वृक्षांचा सहवास हवा असतो. वृक्ष हे परस्परांना खूप जपतात, एवढेच नव्हे, तर ते शेजारील वृक्षासोबत जीवनसत्त्वांचे मुक्तहस्ते आदान-प्रदान करतात. एकंदरीत काय तर आम्हा वृक्ष वारकऱ्यांना प्रत्येक वृक्षात साक्षात विठोबा-रखुमाई दिसतो. वृक्ष वारकऱ्यांचा हा उत्साह फक्त वृक्षारोपण करून थांबला नाही तर गेले संपूर्ण वर्षभर ते या वृक्ष विठोबा रखुमाईची मनोभावे सेवा करीत आहेत. वृक्षांचा केवळ वाढदिवस साजरा करून ते थांबले नाहीत; तर आणखी मोठं जवळपास दुप्पट घनवन उभारण्याची वीट रचली.  

यांचा आहे सहभाग
वृक्षारोपण कार्यक्रमात विष्णू पालखेडकर, अमृत खाबिया, पंकज शाह, विनोद खोबरे, प्रवीण पांडे, राजेश जाटवे, रवी चौधरी, मेघा अग्रवाल, गोविंद पाटोदकर, अनुराधा पांडे, विजय देशमुख, श्रीमती जाटवे, बबिता गुप्ता, किरण सरपोतदार, वैशाली पालखेडकर, शीला खंडेलवाल, मानसी काळे, मृणाल पांडे, युगंधर देशमुख, सृष्टी पांडे यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT