काही सुखद

एकीच्या बळाने फुलविले भाज्यांचे मळे

अलीम शेख

अनाळा - गावात एकोपा असला की तंटे होत नाहीत, हे सर्वज्ञात आहे. परंतु, या एकोप्यातूनच एक गाव भाजीपाल्यात स्वयंपूर्ण झाले आणि गावकऱ्यांनी तीन महिन्यांत थोडीथोडकी नव्हे, तर एक लाखाची बचतही केली! परंडा तालुक्‍यातील वागेगव्हाण या गावाची ही यशकथा प्रेरणादायी आहे.

कुटुंबाला लागणारा भाजीपाला आपल्याच शेतातील, घराजवळच्या रिकाम्या जागेत पिकवून वागेगव्हाण (ता. परंडा) येथील ५९ कुटुंबांनी पोषणबागा तयार केल्या आहेत. वागेगव्हाण गावापासून भीमा-सीना जोड कालवा वाहत असल्याने गावाचे पूर्ण क्षेत्र बागायती आहे. मात्र, कुटुंबास लागणारा भाजीपाला गावाशेजारील बाजारातून विकत आणावा लागत होता. सप्टेंबर २०१८ मध्ये या गावातील आरोग्य कर्मचारी नंदा जगताप यांनी उमेद अभियानमधील जिल्हा कृती संगम कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेतले. गावामध्ये ग्रामसंघ सदस्यांची बैठक घेऊन आरोग्य आणि पोषणासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक घरी भेट देऊन पोषण बागेचे महत्त्व सांगितले. जवळपास ५९ कुटुंबांनी शेतातील रिकाम्या जागेत अर्धा गुंठा ते तीन गुंठ्यांमध्ये पोषण बागा तयार केल्या आहेत. 

जाळ्यांचाही वापर! 
या गावांमध्ये भोई समाजाची उपजीविका मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. त्यांच्याकडील मच्छीमारीसाठीच्या जुन्या जाळ्या मोफत देऊन पोषण बागांना संरक्षित कुंपण केले. यामुळे गावात सामाजिक एकोपा निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेक सोनं तस्करीत तुरुंगात, DGP असलेल्या बापाचं अश्लील व्हिडीओमुळे निलंबन, कोण आहेत IPS के रामचंद्र राव?

Ticket Black Marketing: साडेसहाशेचे तिकीट अडीच हजारांत! भारत-न्यूझीलंड टी-२० सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार, गुन्हेशाखेकडून विक्रेत्याला अटक

Goa Liquor Smuggling Case : ट्रक उघडल्यावर पाण्याच्या बाटल्या पण आणखी खोलात गेल्यावर सापडलं भलतचं, लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची

Viral Video : पनवेल रेल्वे स्थानकावर भारतीय खेळाडूंसोबत गैरवर्तन! ट्रेनमधून उतरवले अन् पाच तास तात्कळत उभं राहण्यास भाग पाडलं, नेमकं काय घडलं?

AI Murder Case : मशीनने केला 'खून'! आई-मुलाच्या मृत्यूमागे AI चा हात? OpenAIवर खटला दाखल; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT