Mumbai-Goa Highway Road Accident esakal
कोकण

Mumbai-Goa Highway : मुंबईहून कोकणात देवदर्शनासाठी निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात; 10 भाविक गंभीररित्या जखमी

या अपघातात १० भाविक गंभीररित्या जखमी झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गणपतीपुळ्याहून मुंबईला जात असताना तुळशीफाटा येथे गाडीचा मागील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला आली.

खेड : मुंबईहून दहा भाविकांसह कोकणात देवदर्शनासाठी निघालेली टेम्पो ट्रॅव्हलर रत्नागिरी- गणपतीपुळे येथून मुंबईला जात असताना खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) तुळशीफाटा येथे आली असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलर विरुद्ध बाजूला जाऊन तेथे असलेल्या मोरीवर आदळून अपघात (Road Accident) झाला.

या अपघातात १० भाविक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना महामार्गावरील कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पनवेल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी (ता. ३) सकाळी सव्वानऊ वाजता झाला.

या अपघातात जखमी झालेले सर्व भाविक हे अमरावती येथील आहेत. चालक शैलेश संपत बिरामने (३२, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) हा टेम्पो ट्रॅव्हलरने (एमएन-४३-बीपी-६९०१) गणपतीपुळ्याहून मुंबईला जात असताना तुळशीफाटा येथे गाडीचा मागील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला आली. त्याचवेळी पुढील टायरही फुटल्याने गाडी मोरीवर आदळली. या अपघातात गाडीच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला.

या अपघातातील जखमींची नावे : अंजली सतीश सकसुळे (वय ५२), सतीश विठ्ठलराव सकसुळे (५९), चेतना जितेंद्र ठाकूर (४२), संगीता नितीन रायचुरा (५४), संगीता ओमप्रकाश गोंधळे (४७), देवांशी जितेंद्र ठाकूर (१२), नितीन रायचुरा (५६), ओमप्रकाश गंगाराम गोडाणे (६०), जितेंद्र मानसिंग ठाकूर (४४, सर्व रा. अमरावती) व चालक शैलेश संपत बिरामणे (३२, रा. कोपरखैरणे नवी मुंबई) असे दहा भाविक जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

हे, भाऊ शोभतात! बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एका दिशेला, पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केलं पाहा Video Viral

Government Stray Dog Policy : शिकवायचं की कुत्री मोजायची? आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर? सरकारचा अजब फतवा, काय आहे नेमका प्लॅन?

Latest Marathi News Live Update : एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईची झळ आता गडचिरोली शहराला

स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

SCROLL FOR NEXT