Accident esakal
कोकण

दुचाकीच्या भीषण अपघातात दहा वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू

खंडाळा येथे बुधवारी संध्याकाळी बल्गर आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दहा वर्षीय चिमुरड्याचा जागीच करुण मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - तालुक्यातील खंडाळा (Khandala) येथे बुधवारी संध्याकाळी बल्गर आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात (Accident) दहा वर्षीय चिमुरड्याचा (Child) जागीच करुण मृत्यू (Death) झाला. तर दुचाकी चालविणारे आजोबा जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणार्या बल्गरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी जिंदाल कंपनीच्या अवजड वाहतुकीला आक्षेप घेत रस्तारोको केला आहे. सध्या खंडाळा परिसरात तणावाचे वतावरण असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार बुधवारी सायंकळी 6 च्या सुमारास तालुक्यातील जयगडस्थित जिंदाल कंपनीच्या जेटीवरुन येणाऱ्या अवजड बल्गर चालकाने भरधाव वेगाने जात होता. तर कोळीसरे येथील माजी सैनिक आर डी तथा रामचंद्र देमाजी सावंत हे आपल्या ऍक्टिव्हा दुचाकी गाडीने कोळीसरे ते खंडाळा या ठिकाणी आपल्या खाजगी कामानिमित्ताने चालले होते. खंडाळा येथील महावितरण कार्यालया जवळ त्यांच्या दुचाकीला बल्गरने मागून जोरदार धडक दिली. बल्गरची धडक इतकी जोरात होती की दुचाकीवर मागे बसलेला दर्शिल प्रमोद सावंत या शाळकरी चिमुरड्याचा रस्त्यावर आदळून जागीच मृत्यू झाला तर आजोबा रामचंद्र सावंत हे जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच कोळीसरेसह संपूर्ण खंडाळा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात एकवटले होते. त्यांनी तात्काळ रास्तारोको करून जिंदाल कंपनी च्या सर्व अवजड वाहनांना थांबविण्याची विनंती करून यापुढे एकही वाहन आम्ही सोडू देणार नाही,असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलीसांचे वरिष्ठ अधिकारी रात्री खंडाळा येथे दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT