10th international abilympics artist Chetan Pashilkar made history in France
10th international abilympics artist Chetan Pashilkar made history in France sakal
कोकण

10th international abilympics : दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने फ्रान्समध्ये रचला इतिहास

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : सुधागड तालुक्यातील तळई या छोट्याशा गावातील दिव्यांग (कर्णबधिर) चित्रकार चेतन पाशिलकर याने भारत देशाचे नाव उंचावले आहे. फ्रान्समध्ये झालेल्या 10 व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स चित्रकला स्पर्धेत रविवारी (ता.26) त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. चाळीस वर्षात पहिल्यांदा भारताला हे सुवर्णपदक मिळाले आहे.

सुप्रसिद्ध चित्रकार चेतन चंद्रकांत पाशिलकर यांनी शारीरिक दृष्ट्या असलेल्या आवाहनांना जिद्दी व चिकाटीने पेलत चित्रकलेच्या दुनियेत याबरोबरच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून आमूलाग्र कामगिरी केली आहे. फ्रान्समध्ये नुकत्याच 10 व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स चित्रकला स्पर्धेत चेतनने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि सुवर्णपदक पटकावले. यामुळे चेतन याने महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुधागड तालुक्यासह भारतातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चेतन पाशिलकर थक्क करणारा प्रवास

जन्मापासून बहिरेपणा आणि श्रवण दोष असल्यामुळे त्यांचे शिक्षण शारीरिक दृष्ट्या आव्हान असलेल्या शाळेमध्ये पूर्ण झालेले आहे. तेथे शिक्षकांच्या संपर्कात असताना स्वतःचे भाव चित्र कलेतून व्यक्त करण्याच्या मार्गावर नेण्यात आले त्यानंतर चित्रकला हे चेतनच्या भावनेचे माध्यम बनले आणि सभोवतालच्या लोकांकडून समर्थ कृपेने चांगली दाद आणि प्रेरणा मिळाली.

त्यानंतर एस.एस.सी. तसेच जी.डी.आर्ट डिप्लोमा आणि बी.एफ.ए.पेंटिंग कला शाखेतून पुणे विद्यापीठातून पूर्ण केली. पुढे शिक्षण चालू ठेवत एम.एफ.ए. चित्रकला पदवी प्रथम श्रेणीने जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई विद्यापीठातून पूर्ण केली. शिकत असताना 105 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये 10 सुवर्ण पदके, 26 इतर पदके, 30 चषक आणि 115 हून अधिक प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. तसेच 2018 मध्ये राष्ट्रीय एबीलिंपिक्स दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये चेतन यांनी भारत देशाकडून सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांनी त्यांच्या काही पेंटिंग्स भारतीय सैन्य दलातील एनएसजी कमांडोज यांना समर्पित केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT