110 Peoples In Contact With Eight Corona Positive In Sindhudurg  
कोकण

सिंधुदुर्गः  "त्या' आठ जणांच्या संपर्कात 110 व्यक्ती

सकाळवृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या 8 कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात 110 व्यक्ती आल्या आहेत. या सर्व व्यक्तींचा शोध पूर्ण झाला असून संपर्कातील सर्व व्यक्तींना क्वारंटाईन ठेवले आहे. या 8 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये 46 जण या अतिजोखमीच्या संपर्कातील असून कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या 64 आहे. आज नव्याने 61 नमुने तपासणीसाठी पाठविले असून प्रलंबित नमुन्यांची संख्या 218 इतकी झाली आहे. अजून दोन बाधितांचे फेर तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याने ते कोरोना मुक्त झाले आहेत; मात्र त्यांना घरी सोडलेले नाही. 

दरम्यान, काल (ता. 23) शनिवारी बाधित रुग्णांपैकी डामरे येथील कुटुंबाच्या संपर्कात 21 व्यक्ती आल्या आहेत. त्यापैकी 4 जण हे अतिजोखमीच्या संपर्कातील तर 17 जण हे कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. धालकाठी येथील रुग्णांच्या संपर्कात 26 व्यक्ती आल्या आहेत. त्यातील 2 जण अती जोखमीच्या संपर्कातील तर 24 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. हिवाळे येथील रुग्णाच्या संपर्कात 40 व्यक्ती आल्या आहेत. त्यापैकी 22 व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील असून 18 जण कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. 23 जण नाधवडे येथील रुग्णाच्या संपर्कात आले आहेत. त्यापैकी 18 जण हे अतिजोखमीच्या व 5 जण हे कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. 

कणकवली तालुक्‍यातील डामरे, वैभववाडी तालुक्‍यातील नाधवडे व मालवण तालुक्‍यातील हिवाळे येथे 5 जून रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. डामरे कंटेन्मेंट झोनमध्ये 32 घरांचा समावेश आहे. त्यामध्ये 39 कुटुंबे असून या क्षेत्राची लोकसंख्या 123 इतकी आहे. तर नाधवडे बाधीत क्षेत्रामध्ये 130 घरातील 147 कुटुंबांमधील 518 लोकसंख्येचा समावेश आहे. हिवाळे बाधीत क्षेत्रामध्ये 69 घरांमधील 81 कुटुंबातील 286 व्यक्तींची समावेश आहे. तर धालकाठी येथे सापडलेले दोन्ही रुग्ण हे संस्थात्मक क्वारंटाईन होते. 

जिल्ह्यात 21 हजार 320 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. त्या पैकी 505 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक क्वारंटाइन कक्षात आहेत. गावपातळीवर 20 हजार 815 व्यक्तींना क्वारंटाईन कक्षात ठेवले आहे. जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्वांना होम क्वारंटाईन ठेवले आहे. जिल्हा रुग्णालयाने 1 हजार 368 नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

रविवारी नव्याने 61 नमुने पाठविले आहेत. त्यापैकी 1 हजार 150 तपासणी अहवाल प्राप्त झालेत. आज एकही नमुना अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या 218 झाली आहे. 16 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 1 हजार 134 अहवाल निगेटिव्ह आलेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात सध्या 67 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 41 रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, 26 रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये ठेवलेत. आरोग्य यंत्रणेमाफत रविवारी 4 हजार 845 व्यक्तींची तपासणी केली. जिल्ह्यातील 16 बाधित रुग्णांपैकी 7 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्गात 2 मेपासून आज अखेर 38 हजार 439 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये खारेपाटण चेकपोस्ट येथून 28 हजार 265, फोंडा - 2 हजार 81, करुळ - 3 हजार 816, आंबोली - 1 हजार 636, बांदा - 1 हजार 838, दोडामार्ग - 803 व्यक्तींनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे. 

सिंधुदुर्गनगरी येथून विशेष रेल्वे रवाना 
सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकातून आज पाचवी श्रमिक विशेष रेल्वे सोडली. दुपारी 1 वाजता राजस्थानातील जयपूरकडे ही रेल्वे रवाना झाली. श्रमीक विशेष रेल्वेने राजस्थानातील 351 मजूर, कामगार त्यांच्या मूळगावी रवाना झाले. यावेळी प्रशासनातर्फे त्यांना फुड पॅकेट्‌स, पाणी बॉटल्स, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. प्रवाशांना निरोप देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

आणखी दोन कोरोना मुक्त 
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचे कोरोनाचे फेर तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे हे दोन्ही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; मात्र त्यांना अद्याप घरी सोडलेले नाही. 

जिल्ह्याची स्थिती 
*बाधित....16 
*एक्‍टिव्ह.....9 
*बरे झालेले......7 
* क्वारंटाईन......21 हजार 320 
*गाव पातळीवर क्वारंटाईन ....20 हजार 815 
*शासकीय संस्था क्वारंटाईन....505 
*तपासणीसाठी पाठविलेले नमुने...1368 
*अहवाल आलेले.....1150 
*रविवारी पाठविलेले नमुने...61 
*प्रलबित अहवाल......218 
*आयसोलेशन कक्षात दाखल.....सध्या 67 ( 18 ने घट ) 
*दिवसभरात तपासणी झालेल्या व्यक्ती....4 हजार 845 
*अखेर जिल्ह्यात आलेले नागरिक....38 हजार 439 
*शनिवारी दाखल झालेले नागरिक....1 हजार 819 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT