16 new corona infected patients in Ratnagiri district 
कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 16 कोरोना बाधित रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात 128 चाचण्यांपैकी 16 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 13 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आज एकाचाही मृत्यू झाला नाही. मृत्यूदर 3.63 वर स्थिर आहे. 

जिल्ह्यात नियंत्रणात असलेली कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दुसऱ्या लाटेच्या भितीने प्रशासन सज्ज असले तरी रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे. गणेशोत्सवानंतर जशी रुग्णांची संख्या वाढली ती परिस्थिती दिवाळीनंतर उद्‌भवू नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 128 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये 16 रुग्ण बाधित सापडले असून 112 निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये 16 आरटीपीसीआर सापडले असून एकही ऍण्टिजेनमधील चाचणी करण्यात आलेली नाही. त्यात रत्नागिरी 2, दापोली 4, खेड 2, मंडणगड 4, लांजा 4 रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 8 हजार 809 झाली आहे. तर 54 हजार 746 जणांचा अहवाल निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 13 रुग्णांनी कोरोनावर मात केली बरे झालेल्यांची संख्या 8 हजार 280 झाली आहे. बरे होण्याचे प्रमाण 93.99 टक्के झाली आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झालेला नसून एकूण बळींची संख्या 320 झाली आहे. मृत्यूदर 3.63 टक्केवर स्थिर आहे. जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरवर 125 जण उपचार घेत आहेत. 

दृष्टिक्षेपात - 
* एकुण पॉझिटिव्ह -- 8,809 
* एकुण निगेटिव्ह --54,746 
* बरे झालेले रुग्ण -- 8,280 
* एकुण मृत्यू -- 320 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT