17 objection on credit ratnagiri out of 83 gram panchayat in ratnagiri 
कोकण

मतदार याद्यांवरील हरकतींमुळे गाजू लागली ग्रामपंचायत निवडणूक

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूण : कोकणी माणूस तत्त्वाला जागणारा..! एकदम रोखठोक असा..! याचा प्रत्यय आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने येऊ लागला आहे. निमित्त आहे, चिपळूण तालुक्‍यातील खेर्डी ग्रामपंचायत निवडणूक याद्यांवरील हरकतींचे. एकट्या खेर्डीतील मतदार याद्यांवर एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 23 हरकती दाखल घेण्यात आल्या आहेत. कोकणीबाणा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत येऊ लागला आहे. चिपळूण तालुक्‍यातून उर्वरित 7 हरकती इतर गावातील असून खेर्डीत निवडणुकीचा रणसंग्राम जोरात रंगणार असल्याचे चित्र आहे. 

तालुक्‍यात पुढील एक - दोन महिन्यात 83 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 1 डिसेंबरला येथील तहसील कार्यालयाकडून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. प्रभागनिहाय या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. 1 ते 6 डिसेंबर दरम्यान त्यावर हरकती दाखल करावयाच्या होत्या. त्यानुसार तालुक्‍यातून एकूण 23 हरकती तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. एखादी व्यक्ती प्रभाग एकमध्ये राहते; मात्र त्यांचे नाव दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाले आहे. अशा स्वरूपाच्या या हरकती नोंदविल्या आहेत. 

तालुक्‍यात खेर्डीसह सावर्डे, वालोपे, कापसाळ, कोमडळा, कळबंस्ते, मोरवणे, दळवटणे, कोंढे, मिरजोळी, रामपूर, चिवेली, कुशिवडे, येगाव आदी 83 ग्रामपंचायतीत पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. या 83 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत जुलै 2020 मध्ये संपली होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र आता या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

तालुक्‍यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभाग रचना करण्यात आली. प्रभाग रचनादेखील चुकीची झाली म्हणून खेर्डीतून तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी झाल्यानंतर ही प्रभाग रचना अंतिम केली आहे. 

"ग्रामपंचायत निवडणूकाबाबत हरकती आल्या असल्या तरी ठराविक गावातील आहेत. त्यांच्या हरकतींचे निरसन करण्याचे काम सुरू आहे. त्यावर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम मतदार यादीचे काम सुरू आहे." 
- जयराज सूर्यवंशी, तहसीलदार चिपळूण 


उद्यापर्यंत सुनावणी 

दाखल झालेल्या हरकतींवर 10 डिसेंबरपर्यंत सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. विशेषतः खेर्डीतील हरकती अधिक असल्याने सुनावणीत यावर कोणता निर्णय होतो, याकडे खेर्डीतील राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. 
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT