35 housing projects halt due to blockade in Ratnagiri kokan marathi news
35 housing projects halt due to blockade in Ratnagiri kokan marathi news 
कोकण

चिंता करू नका टाळेबंदीच्या कालावधीतही कामगारांना पगार मिळणार पूर्ण...

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी :  शहर व परिसरामध्ये सुरू असलेल्या सुमारे 35 ते 40 बांधकाम प्रकल्प कोरोना महामारी (कोविड-19) आणि टाळेबंदीमुळे ठप्प झाले आहेत. शहरात सुमारे दोन हजार कामगार काम करत होते. परंतु ते आपापल्या गावी रवाना झाले असून 379 कामगार वेगवेगळ्या प्रकल्पाच्या ठिकाणी थांबले आहेत. त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती रत्नागिरी क्रेडाईचे अध्यक्ष दीपक साळवी यांनी ‘सकाळ’ला दिली.

हे प्रकल्प आता टाळेबंदी उठल्यानंतर व कामगार येऊ लागल्यानंतरच सुरू होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 379 जणांमध्ये कामगार, वॉचमन, पाणी भरणार्‍यांचा समावेश आहे. त्यांना जेवण, पाणी, सुविधा दिली आहे. क्रेडाई व शासनाच्या माध्यमातून मदत दिली जात आहे. जे कामगार गावी गेले आहेत त्यांनाही पैसे पाठवण्यात आले आहेत.

क्रेडाई, व्यावसायिकांची कामगारांना मदत

टाळेबंदीसंदर्भात बांधकाम व्यवसायाचा आढावा घेतला असता साळवी यांनी सांगितले, व्यवसायातील हा एक चढ-उतार म्हणावा लागेल. कोरोना व टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर रेराने कोणत्याही विनंती अर्जाशिवाय 30 जूनपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यास परवानगी दिली आहे. क्रेडाई संघटना महाराष्ट्राच्या व क्रेडाई इंडियाशी संलग्न आहे. रत्नागिरीप्रमाणेच चिपळूण, लांजा, राजापूर आदी ठिकाणी क्रेडाई असून तिथले प्रकल्पही थांबले आहेत. टाळेबंदीच्या कालावधीतही कामगारांना पूर्ण पगार देण्यात येणार आहे. त्यामुळे कामगारांची चिंता करू नये.

दोन हजार सदनिका व गाळे

रत्नागिरीत क्रेडाईचे 42 सभासद आहेत. त्यांच्या 35 प्रकल्पात साधारण 2000 फ्लॅट, गाळे आहेत. मात्र याचे काम पूर्ण थांबले आहे. 21 दिवसानंतर टाळेबंदी उठल्यानंतर काम सुरू होईल. फ्लॅटच्या दरात कोणतीही वाढ होण्याची शक्यता नाही त्यामुळे ग्राहकांनी काळजी करू नये, असेही साळवी म्हणाले.

दीडशे लोकांना रोजगार

इमारतीचा पाया खणण्यापासून, चिरे तासणे, भिंती उभ्या करणे, प्लॅस्टर करणे, पत्र्याचे कंपाऊंड बांधणी, लोखंडी शिगा, बांधकामाचे साहित्य ट्रकमधून उतरवून घेणे, स्लॅब, पाणी घालणे, रंगकाम नंतर टाईल्स, लाईट फिटींग, लिफ्ट अशा अनेक प्रकारची कामे हे कामगार करतात. एका इमारत प्रकल्पातून किमान शंभर ते दीडशेहून अधिक जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळत असतो. आता ही सारी कामे 14 एप्रिलनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT