40 grampanayt win by shiv sena in ratnagiri with uday samant guidence 
कोकण

उदय सामंतांनी विरोधकांना पाजले पाणी ; रत्नागिरीत 40 ग्रामपंचायतींवर वर्चस्व

राजेश शेळके

रत्नागिरी : रत्नागिरी-संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघावर मजबूत पकड असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना ग्रामपंचायत निवडणुकीत पाणी पाजले. 63 ग्रामपंचायतींपैकी 52 ग्रामपंचायतीवर सेनेचे सरपंच, उपसरपंच बसविले. तर तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींपैकी 40 ग्रामपंचायती ताब्यात घेत वर्चस्व दाखवून दिले. भाजपची पिछेहाट झाली असून गावपॅनेलने काही ठिकाणी बाजी मारली आहे.

नुकतीच झालेली सरपंच, उपसरपंच निवडणूक प्रक्रिया काल पूर्ण झाली. सेना-भाजप अशीच खरी लढत झाली. आपल्या पक्षाचा सरपंच बसविण्यासाठी जोरदार फोडाफोडीचे राजकारण आणि पळवापळी झाली. त्यामुळे काही निकाल अखेरच्या क्षणी बदलले. शिवसेना आणि उदय सामंत यांच्या मजबूत पकडीमुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ सेनेने बांधून ठेवल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या निवडणुकीत 15 ग्रामपंचायती भाजपकडे होत्या; मात्र सामंत यांच्या करिष्म्याने भाजपच्या अनेक ग्रामपंचायती सेनेने खेचून आणल्या. त्यामुळे अवघ्या पाच ग्रामपंचायती भाजपकडे राहिल्या आहेत तर गावविकास पॅनेलकडे चार ग्रामपंचायती गेल्या आहेत.

हेही वाचा - नीलेश राणेंची वायफळ बडबड शिवसैनिकच थांबवणार

काळबादेवी ग्रामपंचायत पक्षविरहित

काळबादेवी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीनंतर भाजपने आपली ग्रामपंचायत असल्याचा दावा केला होता. काही नेत्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. कारण काही वर्षे ही ग्रामपंचायत भाजपकडे होती; मात्र राजकीय कलाटणी मिळाली आणि ही ग्रामपंचायत पक्षविरहित गावपॅनेलच्या ताब्यात गेली. तसा दावा उपसरपंच सुमित भोळे यांनी केला. तृप्ती पाटील सरपंच झाल्या.

"रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदार संघ 63 पैकी 52 ग्रामपंचायतींवर भगवा फडकला आहे तर तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींपैकी 40 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच विराजमान झाले आहेत. याचे सर्व श्रेय शिवसैनिकांना आहे."

- उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT