47 teak trees felled in Amboli forest reserve 
कोकण

आंबोली वनपरिक्षेत्रात ४७ सागवानांच्या झाडांची कत्तल 

भुषण आरोसकर

सावंतवाडी : कोरोनाच्या संकट काळात लाॅकडाऊनचा फायदा उठवत आंबोली वनपरिक्षेत्र विभागाच्या सांगेली उपवडे भिडेगुंडा या जंगलात सुमारे ४७ सागवान अवैधरीत्या तोडण्यात आल्याचे समोर आले आहे. तोडलेले सागवान १९ असून ते वनखात्याने जप्त केले आहेत, असे वनक्षेत्रपाल यांनी म्हटले आहे. 

सागवान तोडणारे विरप्पन मात्र वनखात्याला मिळाले नाहीत असे सांगण्यात आले.

आंबोली वनपरिक्षेत्र विभागातील सांगेली उपवडे या वनखात्याच्या जंगलात भिडेगुंडा या भागात ४७ सागवानांची कत्तल करण्यात आली कोरोणाचा संकट काळामध्ये हे सागवान तोडण्यात आले आहे. त्या ठिकाणी सागवान कत्तल करणाऱ्यांनी  पार्टी देखील केल्याचे चित्र आहे.

याठिकाणी सागवान मुळासकट तोडण्यात आले नसून ते मनमानेल तसे तोडण्यात आले आहेत सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे सागवान वनखात्याच्या मालकीचे असून ते अवैधरित्या तोडण्यात आले आहेत. जंगल पार्टी करत वनखात्याचे साग तोडणाऱ्या वीरप्पनानी सागवान उचलण्यापूर्वी वनखात्याचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि ते जप्त करण्यात आले आहेत. मात्र कोरोणाच्या संकट काळामध्ये जंगल तोड करणाऱ्या या विरप्पनांची चौकशी करून ताब्यात घेण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, आंबोली वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, त्या ठिकाणी ४७ सागवान नव्हे तर १९ सागवान तोडल्याची माहिती आहे आणि  हा सर्व तोडलेला सागवान सावंतवाडी उपरकर डेपोमध्ये जप्त करण्यात आला आहे. सागवान तोडणारे वनखात्याच्या ताब्यात मिळाले नाहीत पण सागवान ते पळवून नेऊ शकले नाहीत. 


याबाबत सखोल चौकशी केली जात आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांनी दिली. 


सागवान तोडल्याची माहिती सांगेली घोलेवाडी गावातील जागरूक नागरिकांनी दिली. ते म्हणाले,  सामाजिक कार्यकर्ते श्री कविटकर यांनी मदत केली. त्यामुळे त्यांच्या पाळीव रेड्याच्या मदतीने वनखात्याने सागवान खाली आणले. प्रत्यक्षात वन गार्ड श्री. शिखरे यांना सागवान तोडणारे विरप्पन माहित आहेत. 

सागवान तोडले तेथे मटण बिर्याणी पार्टी झाली. ते पुरावे नष्ट केले आहेत.  


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT