50 workers decided to cover a distance of 2000 km on foot to West Bengal 
कोकण

आश्‍चर्य ! ते  निघाले पायी पश्‍चिम बंगालला ; जाताना तीन चेकपोस्टवर झाले दुर्लक्ष अन् अडवले कोल्हापुरात ....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळेपश्‍चिम बंगालला गावी जाण्याची ओढ त्यांना अस्वस्थ करत होती. अखेर जयगड (ता. रत्नागिरी) येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील 50 कामगारांनी पश्‍चिम बंगालपर्यंतचा 2 हजार किमी अंतर पायी तोडण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (ता. 11) रात्री 9 वाजता ते निघाले. विशेष म्हणजे या मार्गावरील तीन चेकपोस्ट पार करून ते गेले. जिल्ह्यातील शेवटच्या हद्दीवरील मुर्शी चेक नाक्यावरही त्यांना तपासण्यात आले नाही. आंबा घाट चढून गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत तेथील पोलिसांनी मात्र त्यांना अडवले आणि परवानगी नसल्याने पुन्हा जेएसडब्ल्यू कंपनीकडे परत पाठविले.  


जयगड (ता. रत्नागिरी) येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये पश्‍चिम बंगालचे अनेक कामगार कामाला आहेत. मात्र लॉकडाउनमुळे कंपन्या बंद असल्याने अनेक कामगार अडचणीत आहेत. हाताला काम नाही, कंपनीकडून पगार नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पश्‍चिम बंगालला परत जाण्यासाठी हे कामगार उतावीळ झाले आहेत. मात्र त्यांना जाण्याची कोणतीही व्यवस्था न झाल्याने 50 कामगारांनी जयगड ते पश्‍चिम बंगाल असा पायी प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

तीन चेकपोस्टवरील दुर्लक्षाने....                                      सोमवारी रात्री 9 वाजता त्यांनी पायी प्रवासाला सुरवात केली. जिल्ह्यात त्यांना कोणत्याही तपासणी नाक्यावर थांबविण्यात आले नाही किंवा तपासणी केली नाही. जिल्ह्याची अखेरची हद्द असलेल्या मुर्शी चेक नाक्यावरीही थांबविले नाही.  आंबा घाट सोडून ते पुढे कोल्हापूरच्या हद्दीत गेले आणि आंबा चेक पोस्टवर त्यांना थांबविण्यात आले. त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र मजुरांकडे परवानगी नव्हती. आम्ही जेएसडब्ल्यू कंपनीत काम करीत आहोत. आम्ही आमच्या पश्‍चिम बंगालमध्ये गावी जात असल्याचे सांगितले. तसेच कंपनीने आम्हाला फक्त मार्च महिन्याचा पगार दिला असून एप्रिल महिन्याचा पगार दिला नसल्याचे सांगितले.

जेएसडब्ल्यूतील 50 कामगार 
आंबा चेक पोस्टवरील पोलिसांनी त्यांना पुन्हा रत्नागिरीत जावून रितसर परवानगी घेऊन येण्यास सांगितले. त्यासाठी त्यांना रत्नागिरीत पुन्हा पाठविण्यात आले. पोलिसांनी त्यांना रत्नागिरीत जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करतो, असे सांगितले. पण मजुरांनी गाडीने न जाता पुन्हा पायी जाण्याचा निर्णय घेतला. पश्‍चिम बंगालला जाण्याआधी आम्ही रत्नागिरीला जिल्हाधिकार्‍यांच्याकजडे जावून भेटू व त्यांच्याकडे गावी जाण्यासाठी अधिकृत परवानगी देण्याची विनंती करू असे सांगितले. .                           

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT