०
० 
कोकण

सिंधुदुर्गात नवे ५७  बाधित़, चिंता वाढली

विनोद दळवी

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे तब्बल 57 नवीन रुग्ण मिळाले आहेत. गेल्या पाच दिवसांत 180 रुग्ण मिळाले. परिणामी, जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 322 झाली. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. 

जिल्ह्यात गेल्या दोन-अडीच महिन्यांत स्थिती चांगली होती. रोज नवीन रुग्ण मिळत होते; परंतु संख्या 10 ते 15 च्या दरम्यान होती. यातील अनेक दिवस नवीन रुग्णसंख्या एकेरी आकड्यात होती. राज्यातील अन्य काही जिल्ह्यात दुसरी लाट आली तरी जिल्ह्यात त्याचा प्रभाव नव्हता. मात्र, पाच दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. होळीनिमित्त चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे धोका अधिक वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या सहा हजार 903 झाली आहे. यातील सहा हजार 394 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 181 रुग्णांचे निधन झाले, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून देण्यात आली. 

सक्रिय रुग्णांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. ते ऑक्‍सिजनवर आहेत. जिल्ह्याबाहेर जाऊन सहा रुग्ण उपचार घेत आहेत. आरटीपीसीआर टेस्टमध्ये 40 हजार 793 नमुने तपासण्यात आले. यातील चार हजार 716 पॉझिटिव्ह होते. आज 383 नमुने घेण्यात आले. अँटिजेन टेस्टमध्ये एकूण 29 हजार 683 नमुने तपासले. पैकी दोन हजार 306 नमुने पॉझिटिव्ह होते. नवीन 176 नमुने घेतले. आतापर्यंत एकूण 70 हजार 476 नमुने तपासण्यात आले. 

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे ः देवगड 528 (12), दोडामार्ग 375 (5), कणकवली 2092 (48), कुडाळ 1515 (34), मालवण 655 (19), सावंतवाडी 916 (43), वैभववाडी 208 (9), वेंगुर्ले 583, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 31 (1). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण ः देवगड- 49, दोडामार्ग- 10, कणकवली- 78, कुडाळ- 44, मालवण- 54, सावंतवाडी- 49, वैभववाडी- 14, वेंगुर्ले- 21 व जिल्ह्याबाहेरील- 3. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT