61 new corona positive case in ratnagiri district
61 new corona positive case in ratnagiri district 
कोकण

रत्नागितरीत ६१ नव्या रूग्णांची भर; संख्या दीड हजारच्या घरात 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी -  गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 61 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 1499 झाली आहे. दरम्यान 46 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.  यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 904 झाली आहे.  

आज बरे झालेल्यांमध्ये  जिल्हा कोव्हीड रुग्णालय 5, संगमेश्वर 1,  कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर 5, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली  8,  उपजिल्हा रुग्णालय कामथे-1, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 4, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 12, कोव्हीड केअर सेंटर पाचल 5 आणि  कोव्हीड केअर सेंटर मंडणगड 5  मधील आहेत.
 


पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण असे
 
रत्नागिरी - 31 रुग्ण
घरडा, खेड - 11 रुग्ण
दापोली-04 रुग्ण
कळंबणी-15 रुग्ण
 

 सायंकाळची स्थिती 

 एकूण पॉझिटिव्ह - 1499
 
बरे झालेले  - 904

 मृत्यू  - 49

 एकूण ॲक्टीव्ह - 546 
     

आज जुना माळनाका,  कोतवडे सनगरेवाडी, लांजेकर कम्पाऊंड, भागिर्थी अर्पाटमेंट, फिनोलेक्स कॉलनी, क्रांतीनगर, झारणी रोड, आरोग्य मंदिर, स्टँडर्ड अर्पाटमेंट रत्नागिरी  हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
 

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन

जिल्ह्यात सध्या 148 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 26 गावांमध्ये,  दापोली मध्ये 2 गावांमध्ये, खेड मध्ये 35 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 65 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 8 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
 


संस्थात्मक विलगीकरण 

संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती अशी आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी -  83, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी -  1,  उपजिल्हा रुग्णालय, कामथे - 15,  कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 2, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -3, केकेव्ही, दापोली - 13असे एकूण 117 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
 

होम क्वॉरंटाईन

 मुंबईसह एम. एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन असणांरांची संख्या  18 हजार 73  इतकी आहे.
 13 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह आहेत.


 जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 15 हजार 415  नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 14 हजार 967 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1499 अहवाल पॉजिटीव्ह आले असून  13 हजार 499 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 448 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.   448 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत. 


परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि.  23 जुलै 2020 अखेर एकूण 2 लाख 06 हजार 695 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 02 हजार 381 आहे.
 
संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये हत्तीच्या हल्ल्यात मल्याळम वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार

SCROLL FOR NEXT