70 families from the tribal area get their food due in mandangad kokan marthi news 
कोकण

आदिवासीवाडीतील ७० कुटुंबांना यांच्यामुळे मिळाले धान्य....

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोनामुळे जग थांबले असताना भारत देशातही लॉक डाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याची झळ सर्वच स्तरातील नागरिकांना बसत आहे. मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागालाही आता त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. रोजंदारीवर काम करून पोट भरणाऱ्यांना याचा अधिक सामना करावा लागतो आहे.

शासनाकडून मदत घोषित केली असली तरी ती पोहच होईपर्यंत वेळ लागणार आहे. याचे भान ठेवत तत्परता दाखवून पंचायत समिती सदस्य नितीन म्हामूणकर यांनी लाटवण आदिवासीवाडी, बामणघर आदिवासीवाडी, पालघर आदिवासीवाडी व पालघर गावठण येथील सुमारे ७० कुटुंबांना प्राथमिकता म्हणून धान्याचे वाटप केले. यावेळी सरपंच विकास कासारे, उपसरपंच प्रदिप कासुर्डे, पोलीस पाटील शरद कदम, पालघर ग्रामपंचायत सदस्य अनंत घाणेकर यांनी उपस्थित राहून आपला सहभाग दर्शवला आहे. तसेच कोरोना रोगाबद्दल जनजागृती करून घ्यावयाच्या काळजी याबाबत जनजागृतीही करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधीलकीचे कौतुक करण्यात येत आहे.

 मदतीसह जनजागृतीही 

  सोशल डिस्टन्स वाढवा म्हणून संचार बंदीचे हत्यार उपसण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील कामांवर त्याचा परिणाम झाला. नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आल्याने रोज मजुरी, रोजंदारी करणाऱ्या नागरिकांना घरातच अडकून पडावे लागल्याने रोजगार बुडाला. रोज काम करून संध्याकाळी घरी धान्य आणून जेवणाची व्यवस्था करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. कसे बसे पाच सहा दिवस काढल्यानंतर त्यांच्या खाण्याची अडचण निर्माण होवू लागली आहे.

खरी गरज आहे या कुटुंबांना आहे​

शहर परिसरात अनेक सामाजिक संस्था, ग्रुप व जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. तशाच अडचणी व परिस्थिती आता ग्रामीण भागात निर्माण झाली असून नितीन म्हामूणकर यांनी पुढाकार घेत प्रत्येक कुटुंबाला ५ किलो तांदूळ, डाळ, तेल, मसाला, हळद, मीठ अशा दैनंदिन जीवनातील वस्तूंचे वाटप करीत केलेली सुरवात या मोहिमेला बळ देणारी ठरणार आहे. तालुक्यातील अनेक वाड्यांमधून रोजच्या कामावर जगणारा मोठा वर्ग आहे. त्याला आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

सर्व सूचनांचे पालन करत केली मदत
संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. सरकारी मदत येईपर्यंत रोजंदारी करणाऱ्या कुटुंबांचे हाल होवू नये यासाठी या काळात या कुटुंबांना मदतीचा हात पुढे करण्याची खरी गरज आहे. म्हणून पावले उचलली आहेत. मात्र मदत करीत असताना शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये याकरिता लागू केलेल्या सर्व सूचनांचे पालन केले आहे. याशिवाय सर्व कुटुंबांना सूचनांचे पालन करण्याबाबत जागृत करण्यात येत आहे.
- नितीन म्हामूणकर, पंचायत समिती सदस्य, मंडणगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT