Gonvidgad Fort esakal
कोकण

Govindgad Fort : 'गोविंदगडा'चं ऐतिहासिक महत्त्व पुन्हा अधोरेखित! कोकणातील गडावर सापडले तब्बल 'इतके' तोफगोळे

राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली दहा वर्षे संवर्धनाचे काम सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

Fort Govindgad : गडावर असलेल्या तोफा पाहता, गडावर गोळे मिळतील, असा त्यांचा अंदाज होता.

चिपळूण : शहरातील गोवळकोट (Gowalkot) येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर (Fort Govindgad) फिरण्यासाठी आलेल्या तरुणांना ८० पेक्षा जास्त तोफांचे गोळे (Cannonballs) आढळून आले आहेत. या गडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळे मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चिपळूण (Chiplun) येथील शुभम हरवडे, सनी गिजे, युवराज बेचावडे, ऋग्वेद हरवडे, दिगंबर बांद्रे हे गोविंदगडावर फिरण्यासाठी गेले होते. फेरफटका मारताना सुरुवातीला त्यांना तोफेचे २ गोळे दिसले. तेथील माती बाजूला केली असता त्यांना अजून काही तोफांचे गोळे आढळले.

त्यांनी लगेचच राजे सामाजिक प्रतिष्ठानचे गोवळकोट येथील अध्यक्ष विशाल राऊत यांना संपर्क केला. ते तत्काळ गडावर दाखल झाले आणि त्यांनी उपस्थित मुलांना योग्य त्या सूचना देऊन एक-एक गोळा बाहेर काढण्यास सुरुवात केली. बघता बघता मुलांना सुमारे ८० पेक्षा जास्त गोळे बाहेर काढण्यात यश आले. ते दगडी तोफगोळे आहेत.

राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली दहा वर्षे संवर्धनाचे काम सुरू असून, या आधी चार ते पाच गोळे मिळाले होते. गडावर असलेल्या तोफा पाहता, गडावर गोळे मिळतील, असा त्यांचा अंदाज होता. या वेळी विशाल राऊत, सौरभ टाकळे, गणेश बुरटे, प्रथमेश शिंदे, सोहम हरवडे, आशुतोष राऊत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

अल निनोमुळे 'पाणीबाणी', राज्यात ऑगस्ट २०२७पर्यंत पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय, साठा राखीव ठेवण्याचे आदेश

७५ वर्षीय आजोबांचं नातीसोबत अश्लील वर्तन, संतापलेल्या २० वर्षीय तरुणीने आजोबांना संपवलं; क्रिकेट बॅटने डोक्यात वार करत...

WCL 2026, IND vs PAK: पाकडे पुन्हा तोंडावर आपटले! भारताकडून हवी होती लेखी माफी पण... क्रिकेटच्या मैदानात राडा

SCROLL FOR NEXT