mango king of summer fruit esakal
कोकण

Alphonso Mango : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाशीत तब्बल 90 हजार 'हापूस'च्या पेट्या दाखल; पाच डझनला 'इतका' आहे दर

सध्या पाच डझनच्या पेटीचा सर्वाधिक दर २३०० रुपये असल्याचे व्यापाऱ्‍यांनी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

गतवर्षी हापूसचे उत्पादन कमी होते; मात्र अखेरच्या टप्प्यात आंबा बाजारात येण्यास सुरवात झाली. यंदा सुरवातीला आणि शेवटी आंबा मोठ्या प्रमाणात राहणार आहे.

रत्नागिरी : अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्तावर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai Krushi Utpanna Bazar Samiti) कोकणातील हापूसच्या सुमारे ९० हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. गुढीपाडवा, अक्षय तृतीया हे विशेष मुहूर्त असल्यामुळे बागायतदार या दिवशी हापूस आंबा विक्रीसाठी वाशीला पाठवतात. निर्यातीच्या गोंधळामुळे यंदा हापूसचे दर गतवर्षीपेक्षा कमी आहेत.

सध्या पाच डझनच्या पेटीचा सर्वाधिक दर २३०० रुपये असल्याचे व्यापाऱ्‍यांनी सांगितले. यंदाच्या हंगामामध्ये फेब्रुवारीपासून हापूसची आवक सुरू झाली. सुरवातीला देवगडमधील आंबा (Devgad Mango) अधिक होता; मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात रत्नागिरीमधील आवक वेगाने वाढली. गुढीपाडव्यापासून खऱ्या अर्थाने आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आला. जानेवारीच्या अखेरीस वगळता अवकाळी पावसाचा हापूसला तेवढा फटका बसला नाही. यंदा चार ते पाच टप्प्यात मोहोर आला असून उत्पादनही मुबलक आले आहे.

सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या मार्केटमध्ये १ लाख पेटी आंबा दाखल झाला. त्यात ४७ हजार पेटी कोकणातील हापूसच्या, तर ५३ हजार पेटी या अन्य राज्यातील आंब्याच्या होत्या. गुरुवारी सकाळी अपेक्षेपेक्षा कमी पेट्या वाशीत (Vashi Bazaar) दाखल झाल्या. गुरुवारी ८२ हजार ६०८ पेटीपैकी कोकणातील ४३ हजार ३३६ तर अन्य राज्यांतील ३९ हजार २७२ पेटी आंबा होता. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात आंब्याला मागणी असते. दुबई बाजारात रत्नागिरी हापूसची पेटी ५ हजार रुपये दराने विकली जात असल्याची माहिती मिळत आहे.

गतवर्षी हापूसचे उत्पादन कमी होते; मात्र अखेरच्या टप्प्यात आंबा बाजारात येण्यास सुरवात झाली. यंदा सुरवातीला आणि शेवटी आंबा मोठ्या प्रमाणात राहणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आंबा कमी असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वाशीत अक्षय तृतीयेला गेलेल्या पेट्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. त्याचा फायदा हापूसचे दर स्थिरावण्यासाठी होऊ शकतो. दर्जेदार हापूसच्या ६० फळांच्या पेटीला २२०० ते २३०० रुपये दर मिळत आहे.

यंदा वैशाख वणव्यातील उन्हाच्या झळा लवकर जाणवू लागल्या आहेत. त्याचा परिणाम निश्‍चितच हापूसवर दिसून येतो. फळ लवकर तयार होत आहे. यावर्षी अक्षय तृतीयेला गतवर्षीच्या तुलनेत दर कमी आहे. वातावरणातील बदलांमुळे संपूर्ण हंगामात आंबा मुबलक असला तरीही दर्जेदार फळांची आवक कमी राहिली आहे.

-अशोक हांडे, व्यावसायिक

मुहूर्त साधून हापूसची आवक वाशी बाजारात सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात आलेल्या मोहोराचे उत्पादन १५ मे नंतर हाती येईल. या आठवड्यात उत्पादन कमी आहे; मात्र दर्जेदार आंब्याला दर चांगला मिळत आहे.

-प्रदीप सावंत, आंबा बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT