bout 295 days after the arrival of the pilgrimage Gangammai in rajapur kokan marathi news  
कोकण

तब्बल 295 दिवसांनी येथे झाले तीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन ....

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : सध्या जगामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातलेले असताना राज्यासह-राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे आज (ता.15) उन्हाळे तीर्थक्षेत्री सकाळी 6 वा. च्या सुमारास आगमन झाले. चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहीत आहे. दर तीन वर्षांनी आगमन आणि तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर निर्गमन करणार्‍या गंगामाईच्या गतवर्षीच्या आगमनाला वर्षपूर्ती होण्यापूर्वी आणि निर्गमनानंतर तब्बल 295 दिवसांनी गंगामाईचे आगमन झाले.  


राज्याच्या कानाकोपर्‍यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे 25 एप्रिल, 2019 मध्ये आगमन झाले होते. त्यानंतर साठ दिवसांचे वास्तव्य केल्यानंतर 24 जून, 2019 रोजी गंगामाईचे निर्गमन झाले होते. त्यानंतर तब्बल 295 दिवसांनी पुन्हा एकदा गंगामाईचे तीर्थक्षेत्री आगमन झाले आहे. उन्हाळे येथील काही ग्रामस्थांच्या सकाळी गंगामाईचे आगमन झाल्याचे निदर्शनास आले. आज सकाळी नेमके किती वाजता गंगामाईचे आगमन झाले याबाबत निश्‍चित माहिती नसली तरी, सकाळी 6 वा. च्या सुमारास गंगामाईचे आगमन झाल्याचा माहिती गंगा देवस्थानचे श्रीकांत घुगरे यांनी दिली.

गंगामाईचे आगमन झाल्यानंतर गंगामाई चांगली प्रवाहीत असून सर्व कुंडांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले आहे. गायमुखही सध्या प्रवाहीत आहे. गंगामाईच्या पाण्याने पवित्र स्नान करण्यासाठी राज्यासह राज्याबाहेरील भाविक मोठ्यासंख्येने गंगेच्या वास्तव्याच्या काळात या ठिकाणी येतात. पाताळातून अवचितपणे प्रगटणारी आणि अवचितपणे निर्गमित होणाऱ्या गंगा माईचे कोडे विण्यानालाही सुटलेले नाही. गंगामाईच्या वास्तव्याच्या काळात राज्यासह राज्याबाहेरील मोठ्या संख्येने भाविक पवित्र स्नान करण्यासाठी याठिकाणी येतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने भाविकांना गंगामाईच्या पवित्र पाण्याने स्नान करण्याची संधी हुकणार आहे.  

गंगेचे झालेले आगमन आणि तिच्या वास्तव्याचा काळ

मार्च, 1985 (68 दिवस), जून, 1885(17 दिवस), डिसेंबर, 1886 (45 दिवस), ऑक्टोंबर, 1989(18 दिवस), डिसेंबर, 1890 (45 दिवस), ऑगस्ट, 1893 (16 दिवस), जुलै,1895 (18दिवस), जून, 1897 (22 दिवस), एप्रिल, 1899 (45 दिवस), मार्च, 1901 (45 दिवस), एप्रिल, 1902 (52दिवस), एप्रिल, 1905 (66 दिवस), सप्टेंबर, 1908 (51 दिवस), मार्च, 1910 (51 दिवस), मे, 1913 (36 दिवस), जून,1915 (29 दिवस), सप्टेंबर,1918 (53दिवस), त्यानंतर 18 वर्षाचा खंड,  जुलै, 1936(12 दिवस), जून, 1938 (27 दिवस), एप्रिल, 1942 (45 दिवस), ऑक्टोंबर, 1945 (33 दिवस),

मार्च, 1948 (39 दिवस), मार्च, 1950 (53 दिवस), जानेवारी, 1952 (27 दिवस), जुलै, 1955 (48 दिवस), 5 मे,1957 (41 दिवस), 8 मार्च,1960(61 दिवस), 23 जानेवारी, 1963 (48 दिवस), 7 मार्च, 1965 (50 दिवस), 8 मार्च, 1967 (71 दिवस), 2 मार्च,1970 (72 दिवस), 2 जानेवारी, 1973 (59 दिवस) 28 डिसेंबर,1974 (64 दिवस), 22 फेब्रुवारी,1977 (83 दिवस), 30 डिसेंबर,1979(68 दिवस), 4 जून,1981(18 दिवस), 5 जून,1983(21 दिवस), 4 मे,1985(45 दिवस), 17 मार्च, 1987(69 दिवस), 3 एप्रिल,1990(59 दिवस), 30मार्च, 1993(75 दिवस), 10 जून,1995 (61 दिवस), 25 एप्रिल,1998(62 दिवस), 26 जानेवारी, 2001 (98 दिवस), 9 एप्रिल, 2003 (29 दिवस),  20 डिसेंबर,2004(63 दिवस), 13 मे,2007 (70 दिवस), 28 मे, 2009 (70 दिवस), 10 फेब्रुवारी, 2011 (116 दिवस), 11 एप्रिल, 2012, 23 जून, 2013, 23 जुलै,2014, 27 जुलै, 2015, 31 ऑगस्ट, 016, 7 मे, 017, 6 डिसेंबर, 017, 7 जुलै, 018, 25 एप्रिल, 2019 (60 दिवस)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT