above 1700 hectares crop of rice damage in konkan 1 crore 15 lakh loss by farmers in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत १७०० हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित ; एक कोटी १५ लाखांचा फटका

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार १७०० हेक्‍टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. शासकीय अंदाजानुसार एक कोटी १५ लाखांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रत्यक्ष पंचनाम्यावेळी हा आकडा तिप्पट होईल, अशी शक्‍यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

परतीच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे घेतला. या वेळी कोकणातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत.

पावसातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात १७०० हेक्‍टर भातशेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान रत्नागिरी, राजापूर, लांजा तालुक्‍यात नोंदले जाण्याची शक्‍यता आहे. रत्नागिरी तालुक्‍यात ३०० हेक्‍टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्ष पंचनाम्यावेळी यामध्ये वाढ होऊ शकते. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली शेती, कापून भिजलेले भात, भिजलेला पेंढा आणि पावसाने आडवं होऊन कोंब येण्याची प्रक्रिया अशा चारप्रकारे नुकसानाचे सर्वेक्षण केले जात आहे.

चौथ्या दिवशी जिल्ह्यात पावसाचा जोर पूर्णतः ओसरला आहे. शनिवारी सकाळी कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तीन दिवसांनंतरही जिल्ह्यातील नदीकिनारी भागात असलेल्या शेतीत अजूनही चार ते पाच फूट पाणी साचलेले आहे. कातळावर कापून ठेवलेली शेती पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. उशिरा तयार झालेल्या गरव्या शेतीवर परिणाम होणार असून, त्यात दाणेच शिल्लक राहणार नाहीत, अशी स्थिती जिल्ह्यात आहे. कडकडीत ऊन पडल्यामुळे काही शेतकऱ्यांनी भिजलेले भात सुकवून झोडण्यास सुरवात केली आहे; गावखडी येथे काही ठिकाणी अजूनही शेतात ३ ते ४ फूट पाणी असल्यामुळे ते कापणे अशक्‍य झाले आहे.

नजर अंदाजित जिल्हानिहाय नुकसान
  जिल्हा        नुकसान (हेक्‍टर)
   ठाणे           ९ हजार ४६५
  पालघर         १ हजार ५५०
  सिंदुधुर्ग        ६ हजार
  रत्नागिरी        १ हजार ६००
   रायगड         १६ हजार

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपयाचा नवा नीचांक! डॉलरच्या तुलनेत ९५ रुपयांवर, अनेक वस्तू होणार महाग?

BMC चा नवा आयुक्त कोण होणार? ४ IAS अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा; राजकीय-प्रशासकीय हालचाली वाढल्या

War-Proof Jobs in India: युद्ध असो वा आर्थिक तणाव, तुमच्या करियरला धक्का न देणाऱ्या भारतातील टॉप 5 ‘वॉर-प्रूफ’ नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या डिटेल्स

असाही कचरा डेपो! कॅमेरा घेऊन जायला मोजावे लागतात ५०० रुपये, तर प्री वेडिंगसाठी ५ हजार

झोपडपट्टी भागातील पाणी समस्या संपणार! १४ किलोमीटरची पाइपलाइन टाकणार; नवा जलप्रकल्प काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT