संगमेश्वर (रत्नागिरी) : कंटेनरने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात संगमेश्वरजवळच्या कोंडअसुर्डे येथील दीर आणि भावजय यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे चव्हाण कुटुंबीयांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात कुटुंबातील आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. यशवंत दिनकर चव्हाण (५८) आणि रश्मी राजेंद्र चव्हाण (४८) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
यशंवत दिनकर चव्हाण ऊर्फ बावा चव्हाण हे आठवडाभर आजारी होते. त्यांच्यावर डेरवण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा आजार वाढत गेल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविले होते. कोल्हापूर येथे उपचार झाल्यानंतर त्यांना परत संगमेश्वर येथे आणण्याचे ठरले. खासगी रुग्णवाहिकेने त्यांना संगमेश्वर येथे आणण्यात येत होते. रुग्णवाहिकेमध्ये यशवंत चव्हाण यांच्या सोबत वैशाली श्रीकांत चव्हाण, पांडुरंग रघुनाथ टाकले असे आणखी दोघे बसले होते. रुग्णवाहिकेने परतत असताना पन्हाळा वाघबिळ येथील वळणावर बुधवारी (२४) संध्याकाळी ५.३० वा. दरम्यान आले असता, त्यांच्या रुग्णवाहिकेला कंटेनरने जोरदार धडक दिली. अपघातात यशवंत चव्हाण यांचा आणि रश्मी राजेंद्र चव्हाण यांचा मृत्यू झाला तर वैशाली श्रीकांत चव्हाण या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.
हेही वाचा - एक बॉल हवेत उडवला त्यातही फडणवीस झेल बाद झाले
असुर्डे येथील चव्हाण कुटुंबीयांच्या रुग्णवाहिकेला अपघात घडल्याचे समजताच संगमेश्वर, असुर्डे तसेच जवळच्या गावातील ग्रामस्थांनी पन्हाळा येथे धाव घेतली. चव्हाण कुटुंबीयांच्या इतर जखमी व्यक्तींना हलविण्यासाठी प्रयत्न केले. यशवंत चव्हाण यांनी संगमेश्वरमध्ये अनेक वर्षे गाडीचा व्यवसाय केला. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मोठा परिवार होता. तसेच त्यांच्या घरी धार्मिक कार्यक्रमही होत असत. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या राहत्या घरी अनेकांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.