accident in ratnagiri on mumbai goa highway one dead in accident 
कोकण

मुंबई-गोवा हायवेवर झालेल्या अपघतात एकजण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात तरुणाचे मृत्यू झाला. राकेश तुकाराम गुरव (वय ३२) असे तरुणाचे नाव आहे. तालुक्‍यातील ओणी येथील रस्त्याच्या कठड्याचा अंदाज न आल्याने त्यावर दुचाकी आदळून अपघात झाला. दुसरा दुचाकीस्वार समीर शंकर बाईत हा गंभीर जखमी झाला असून, त्याला रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारांसाठी दाखल केले आहे. ही घटना काल (३१) रात्री सव्वानऊच्या सुमारास ओणी येथील पेट्रोलपंपासमोर घडली. 

ओणी येथील पेट्रोलपंपाकडून राकेश तुकाराम गुरव आणि समीर बाईत हे दुचाकीने (एमएच-०५-डीएच-६०३९) चुनाकोळवणकडे चालले होते. ओणी येथील पेट्रोलपंपासमोर असलेल्या कठड्याजवळ दुचाकी आली असता, त्या कठड्यावर गाडी आदळली. यावेळी समीर शंकर बाईत हा दुचाकी चालवित होता. राकेश तुकाराम गुरव मागील सीटवर बसले होते. या अपघातामध्ये दोघांनाही जबरदस्त मार लागला. त्यामध्ये राकेशला डोक्‍याला मार बसल्याने तो जागीच गतप्राण झाला.

समीर हा गंभीर जखमी झाला. त्याला रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती तुकाराम बापू गुरव यांनी राजापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सुरेंद्र जाधव हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT