Active Friends Activities Planting of 300 saplings along the road in ratnagiri 
कोकण

ग्रामस्थांचा संकल्प : सत्कोंडीत वृक्ष वल्ली आम्हा सोयरी....चा गजर ....

राजेश कळंबटे

रत्नागिरी :  शासकीय वृक्ष लागवड यंदा कोरोनामुळे होणे अशक्य असताना रत्नागिरीतील नेहरु युवा केंद्र संलग्न सत्कोंडीतील अ‍ॅक्टिव्ह फण्ड्स सर्कल या संस्थेने सत्कोंडी येथे मुख्य रस्त्याच्या बाजुने सुमारे  100 पेक्षा जास्त झाडांची लागवड करत वृक्ष वल्ली आम्हा सोयरी.....चा संदेश दिला. यामध्ये बदाम, सुरु, रेन ट्री, लेप्टोस्पेरम, बहावा यांसारख्या वृक्षांचा समावेश होता.


सत्कोंडी गावातून जाणारा मुख्य रस्ता हा सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा असून जवळपास जांभ्या खडकातून जातो. या रस्त्याच्या बाजूने जांभ्या कातळात झाडे लावून जगवणे हे खरोखरच आव्हानात्मक काम आहे. मात्र अ‍ॅक्टीव्ह फण्ड्स सर्कल सत्कोंडीने ग्रामस्थांच्या सहकार्याने हे आव्हान लीलया पेललं आहे. रस्त्याच्या बाजूने उभी असणारी झाडे याची साक्ष देत उभी आहेत.

रविवारी ( 12)  झालेल्या वृक्षारोपण उपक्रमांत अ‍ॅक्टीव्ह फण्ड्स सर्कल सत्कोंडीचे सुमारे 50 सदस्य उपस्थित होते. नविन झाडांची लागवड तसेच जुन्या झाडांना खत माती देणे, आधार काठ्या लावणे, उपलब्ध टी गार्ड ने झाडे संरक्षित करणे, झाडांभोवती दगडी बांध घालणे अशी अनेक कामे यावेळी करण्यात आली. सकाळी  10 वाजता सुरु झालेले काम मध्यंतराचा काळ सोडता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु होते. वृक्षारोपण हा शब्द दरवर्षी घासुन घासून गुळगुळीत झाला असला तरी वृक्षारोपण व वृक्ष संगोपन याबाबतीत सत्कोंडीकरांमध्ये निर्माण झालेला सकारात्मक दृष्टीकोन व जागृती निश्‍चितच अनुकरणीय आहे.

रस्त्याशेजारी 300 रोपांची लागवड


या उपक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडाशिक्षक आणि अ‍ॅक्टीव्ह फण्ड्स सर्कल चे नितीन जाधव, प्रियांका व प्राजक्ता बंडबे, सुहास काताळे व सुचिता काताळे यांनी अल्पोहारची व्यवस्था करुन दिली होती. या उपक्रमास नेयुकेचे जिल्हा युवा समन्वय श्री. सैनी, श्री. गुरव, उपसरपंच सतीश थूळ यांचे मार्गदर्शन लाभले. जुलै महिन्यामध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन  ग्रामस्थांचे एक दिवसाचे श्रमदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आवळा, बेहडा, कुंभा, चाफा अशा सुमारे 300 रोपांचे रोपण करण्यात येणार आहे.

ग्रामस्थांचा संकल्प

भविष्यात सत्कोंडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने रस्त्याच्या बाजुने लावलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी दोन किलोमीटर लांबीची ठिबक सिंचन व्यवस्था, झाडांसाठी चिर्‍याचे पक्के कट्टे, सुमारे 300 टी गार्डची निर्मिती करण्याचा संकल्प केला आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीनंतर सुळेंचा कुमावतांना फोन; परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण

Dombivli Politics: 'मोदी भेटीतून प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा राजकीय मास्टरस्ट्रोक'; ठाण्यात भाजप-शिंदे गटात सूक्ष्म सत्तासंघर्ष..

MPSC Result: सर्व टप्पे पार करूनही यादीतून वगळले; ‘राज्यसेवा परीक्षा-२०२४’च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी

Shivraj Singh Chouhan : एक-दोन रुपये पीकविमा मिळणं ही थट्टा! अकोल्यातील शेतकऱ्याच्या तक्रारीची थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांनी घेतली दखल...

आनंदाची बातमी! सोलापुरातील १९ विद्यार्थी झाले सीए; १०८ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा, राज्यात वाजताेय डंका..

SCROLL FOR NEXT