Administration looking for a place for Kovid Hospital 
कोकण

धक्कादायक सत्य : गेल्या 8 तासापासून कोरोनाग्रस्तावर उपचार नाहीच....  

मयूरेश पाटणकर

गुहागर (रत्नागिरी)  : संस्थात्मक विलगीकरणासाठी परवानगी दिलेल्या वेळेणेश्र्वरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाला त्यांच्या इमारतीत ठेवण्याची परवानगी नाकारली. कोविड रुग्णालय नसल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाला कोठे ठेवायचे या प्रश्र्नाचे उत्तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रशासनाला मिळाले नव्हते.  त्यामुळे सायंकाळपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार सुरु झाले नव्हते.
 
जामसुतमधील मृत व्यक्ती आणि  त्या व्यक्तीचा केअर टेकर अशा दोघांच्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यातील केअर टेकर कोरोनाग्रस्ताला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविणे आवश्यक होते. मात्र त्या रुग्णाला गुहागरातील कोविड रुग्णालयात ठेवा असा आदेश आला. प्रत्यक्षात गुहागरमध्ये आजही कोविड रुग्णालयाची जागा निश्चित झालेली नाही. अशा परिस्थितीत सदर रुग्णाला वेळणेश्र्वर अभियांत्रिकी महाविद्यालयातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय झाला.

यावेळीही कोविड संदर्भातील मार्गदर्शक मुल्ये पायदळी तुडवली गेली. संस्थात्मक विलगीकरण कक्षात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठेवून तेथे ठेवलेल्यांचे जीवन धोक्यात घालण्याचा निर्णय तालुका प्रशासन कसे घेऊ शकते. शिवाय ही इमारत विद्या प्रसारक मंडळाची आहे. त्यांनी केवळ संस्थात्मक विलगीकरणासाठी इमारत दिली होती. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्ण ठेवताना संस्थेची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र ते सौजन्यही प्रशासनाने दाखविले नाही.

स्वतंत्र कोविड रुग्णालय गुहागरात व्हावे अशा सूचना महिनाभरापूर्वी महसुल आणि आरोग्य विभागाकडे आल्या आहेत. त्या आधीच शिवतेज फाऊंडेशनने निरामय रुग्णालय ताब्यात घेण्यासाठी फेसबुक अभियान केले. मात्र शासनाकडे अधिकार असूनही सदर इमारत ताब्यात घेण्यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. गेल्या 15 दिवसात महसुल आणि आरोग्य प्रशासन कोविड रुग्णालयासाठी जागा शोधु शकलेले नाही. यामुळे जामसुतमधुन उपचारासाठी ताब्यात घेतलेला कोरोना रुग्ण सायंकाळपर्यंत ग्रामीण रुग्णालय गुहागर आणि रुग्णवाहिकेत बसून होता.

आम्ही कोविड रुग्णालयासाठी  जागेच्या शोधात आहोत. मात्र ती जागा उपलब्ध झाली नाही तर कोविड केअर सेंटर (सी.सी.सी.) तयार करुन तेथे रुग्णाला ठेवण्याचा प्रयत्न करु.
  प्रविण पवार, उपविभागीय अधिकारी, चिपळूण
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Crime: सातबाऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी लाच मागितली; महिला ग्राममहसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, एसीबीची कऱ्हाडमध्ये कारवाई

Quick Morning Breakfast Recipe: रात्रीचं वरण शिल्लक राहिलंय? मग सकाळच्या नाश्त्याला त्याचे असे टेस्टी पराठे नक्की बनवा

आजचे राशिभविष्य - 04 जून 2026

प्रवेशाची वेळ जवळ, पण...! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास ‘एआयसीटीई’ची मिळेना मान्यता; ‘बाटू’कडील संलग्नीकरणावरही निर्णय नाही

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT