कोकण

'राऊतांनी उगाच माझ्या फंदात पडू नये'; केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

कोणी कोणावर टीका करावी याचे भान राऊतांनी ठेवावे. उगाच माझ्या फंदात पडू नये.

दोडामार्ग : संसदेत भेटल्यावर मी तुमच्यासोबत आहे साहेब, असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) समोरासमोर बोलतात; मात्र माझ्या अपरोक्ष टीका करतात. (Political Update) कोणी कोणावर टीका करावी याचे भान राऊतांनी ठेवावे. उगाच माझ्या फंदात पडू नये, असा सल्ला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राऊत यांना दिला.

शेवटच्या दिवशी राणे यांची जन आशीर्वाद यात्रा (Jan aashirvad yatra) दोडामार्ग पिंपळेश्वर सभागृहात आली. तेथे तालुकावासीयांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यावेळी राणे बोलत होते. (konkan News) यावेळी यात्रा संयोजक माजी आमदार प्रमोद जठार, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कालिदास कोळंबकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी, दोडामार्ग तालुका भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, 'दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी आपण उद्योगमंत्री असताना आडाळी येथे एमआयडीसी अस्तित्वात आली; मात्र गेली सात वर्षे सत्तेत असलेल्या स्थानिक आमदार केसरकर यांनी एक दगड तरी ठेवला का, अशा कुचकामी आमदाराला पुनश्च निवडून देऊ नका अशी टीका करत उद्योगमंत्री सुभाष देसाई उद्योग बंद करतात. रोजगार उपलब्ध करण्याचे सोडून जमिनी विकणारे हे बिनकामी सरकार जनतेचे भले तरी काय करणार ? जनआशीर्वाद यात्रे दरम्यान माझ्या प्रति असलेले दोडामार्गवासीयांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. कोणत्या जन्मीचे पुण्य मला लाभले की एवढे प्रेम माझ्यावर माझे बांधव करीत आहेत. त्यांचे उपकार मी फेडू शकत नाही. माझ्याकडे असलेल्या केंद्रीय मंत्रिपदाचा पुरेपूर फायदा माझ्या कोकणासाठी करणार आहे.'

यावेळी विजयकुमार मराठे, माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य बाळा नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, चेतन चव्हाण, शैलेश दळवी, राजेंद्र निंबाळकर, सूर्यकांत गवस, संतोष नानचे, वैष्णवी रेडकर, रेश्मा कोरगावकर, सूर्यकांत गवस,विलास सावंत, संदिप नाईक, रंगनाथ गवस,देवेंद्र शेटकर,पराशर सावंत, सुनिल गवस, दिपक गवस, विशांत तळवडेकर, पांडुरंग बोर्डेकर, वैष्णवी रेडकर, रेश्मा कोरगावकर, संध्या प्रसादी, अदीती मणेरीकर, उपमा गावडे, सुधीर पनवेलकर, प्रमोद कोळेकर, दादा रेडकर, स्वप्निल गवस, समिर रेडकर, राजेश फुलारी, योगेश महाले, बाळा रेडकर, शाणी बोर्डेकर, विशाल मणेरीकर, विशाल चव्हाण, सुमित म्हाडगुत, रोहीत हळदणकर, पिकी कवठणकर, लक्ष्मण खडपकर, विठोबा पालयेकर, विशाल बोर्डेकर, चंद्रकांत खडपकर, चंद्रकांत गवस, दिलीप परमेकर, संतोष नाईक, सिद्धेश पांगम, कल्पना बुडकुले,संजय सातार्डेकर, स्वप्निल निंबाळकर, प्रकाश गवस, सचिन गवस, प्रेमनाथ कदम, गोट्या कळणेकर, सुर्यनारायण गवस, आपा गवस, मिनल देसाई, संगिता देसाई उपस्थित होते.

माझ्या लोकांना उद्योजक बनवायचे आहे

येथील स्थानिक आपल्या जमिनी दुसऱ्यांना विकतात आणि त्याठिकाणी परप्रांतीय उद्योजक बनतात; परंतु माझ्या लोकांना उद्योजक बनविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती देण्यासाठी कुडाळ येथे दोनशे कोटीचे ट्रेनिंग सेंटर सुरू करणार आहे. सुष्म उद्योगासाठी १ कोटीपर्यंत कर्ज, लघु उद्योगासाठी ५० कोटीचे कर्ज व मध्यम उद्योगासाठी अडीचशे कोटीचे कर्ज केंद्रामार्फत देण्यात येईल. याचा पुरेपूर फायदा घेऊन येथील लोकांनी स्वतः उद्योजक बनण्याचे आवाहन राणे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

SCROLL FOR NEXT