agricultural college from state employee seven commission start in ratnagiri 
कोकण

कृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

चंद्रशेखर जोशी

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. या संदर्भातील शासन आदेश आज निर्गमित करण्यात आला असून यामुळे कृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्‍त केला जात आहे.

राज्य सरकारच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग केव्हाच लागू करण्यात आला होता. तसेच अकृषिक विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनाही तो लागू करण्यात आला होता; मात्र राज्यातील कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना तो लागू करण्यात न आल्याने कृषी विद्यापीठातील कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित राहिले होते. 

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते, मात्र कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी लवकरच कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता करण्यात आली असून याचा लाभ दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील सुमारे 1 हजार 500 कर्मचाऱ्यांना होणार आहे. 

राज्यातील सर्व कृषी विद्यापीठ संलग्न सर्व कृषी महाविद्यालये, विद्यालये, ग्रामीण शिक्षणसंस्था वर्धा व अमरावती येथील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याचे आदेश राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य विभागाच्यावतीने आज काढण्यात आला आहे; मात्र अद्याप कृषी विद्यापीठातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात न आल्याने नाराजी व्यक्‍त केली जात असून काही दिवसांनी या संवर्गातील कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

"राज्य शासनाने राज्यातील कृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल आम्ही शासनाचे, मुख्यमंत्री महोदय, कृषिमंत्री महोदय तसेच आमच्या लढ्यात आम्हाला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो."

राकेश विचारे, अध्यक्ष, कोकण कृषी विद्यापीठ वाहनचालक संघटना

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Kolhapur Wildlife Attack : अवघ्या सव्वा वर्षांच बाळ वडिलांच्या कुशीत शांत झोपलं अन् कोल्ह्याने बरोबर हेरलं; कोल्हापूरच्या चंदगडमध्ये घडलं भयानक

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प

Nagpur Gas Cylinder Price: धुराचे लोट; गॅस टंचाईमुळे गृहिणी पुन्हा चुलीकडे! सरपण गोळा करण्यासाठी महिलांची वणवण

SCROLL FOR NEXT