कोकण

आमदार वैभव नाईकांमुळे कृषी प्रदर्शन रद्द

सकाळवृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेचे कृषी व पशु-पक्षी प्रदर्शन २६ ते १ मार्च या कालावधीत कुडाळ येथे आयोजित केले होते; मात्र आमदार वैभव नाईक यांनी त्याच ठिकाणी २८ ते ३ मार्च या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा अडवून जाणीवपूर्वक हे प्रदर्शन होऊ नये म्हणून अडवणुकीचे धोरण अवलंबले आहे. 

साहजिकच एसटी महामंडळाकडून कुडाळ एसटी डेपोची जागा देण्यास असमर्थता दाखविली आहे. यामुळे यावर्षीचे नियोजित कृषी पशु-पक्षी प्रदर्शन तूर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व कृषी सभापती रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेतर्फे गेली चार वर्षे कुडाळ एसटी डेपोच्या जागेत कृषी पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात येते. कुडाळ येथे २६ ते १ मार्च या कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन केले होते. याबाबतचे पूर्वनियोजनही पूर्ण केले होते; मात्र नाईक यांनी २८ ते ३ मार्च या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी १४ ला जागेची मागणी केली आणि त्यांना एसटी महामंडळाकडून एसटी डेपोची जागा उपलब्ध करूनही दिली; मात्र जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुपक्षी मेळाव्यासाठी जागेची मागणी करूनही जागा उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शविली आहे.

जिल्हा परिषदेचा कृषी पशुपक्षी मेळावा होऊ नये यासाठी वैभव नाईक यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या नियोजित प्रदर्शनाला अडवणूक करून त्या ठिकाणी आमचा हक्‍क डावलून सांस्कृतिक कार्यक्रम न करता कृषी प्रदर्शन भरविल्यास आमचा जाहीर विरोध राहील, असेही अध्यक्ष सावंत यांनी स्पष्ट केले.

हे प्रदर्शन होऊ नये म्हणून नाईक यांनी केलेले प्रयत्न आणि त्याच्या दबावाखाली कणकवली वाहतूक नियंत्रक यांची जागा उपलब्ध करून न देण्याची भूमिका लक्षात घेता जिल्हा परिषदेतर्फे आयोजित प्रदर्शन रद्द करून यासाठी राखून ठेवलेला ३२ लाखांचा निधी अन्य योजनांकडे वळविण्याचा निर्णय आज घेतला आहे; मात्र  नाईक यांचा त्याच ठिकाणी होणारा सांस्कृतिक कार्यक्रम काही कारणास्तव रद्द झाल्यास आम्हाला एसटी महामंडळाकडून प्राधान्याने तात्काळ जागा उपलब्ध करून घ्यावी.

आम्ही शेतकऱ्यांसाठी ८ दिवसांत नियोजन करून कृषी पशुपक्षी प्रदर्शन भरविण्यासाठी सक्षम आहोत, असेही अध्यक्षा सावंत आणि रणजित देसाई यांनी सांगितले. यावेळी महिला बाल कल्याण सभापती पल्लवी राऊळ, सदस्या समिधा नाईक उपस्थित होत्या.

कृषी पशु-पक्षी मेळाव्याची निविदा प्रक्रिया होऊन २६ ते १ मार्च ही तारीख निश्‍चित झाली होती; मात्र आमदार नाईक यांनी एसटी डेपो मैदान सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बुकींग केल्यामुळे ही जागा मिळाली नाही. गैरसोय होऊ नये म्हणून जि. प.ने नियोजित तारखांमध्ये बदल करून २४ ते २७ या कलावधीत तो घेण्याचा निर्णय घेतला व जागेच्या मागणीचे पत्रदेखील विभाग नियंत्रकांना दिले; मात्र दखल घेतलेली नाही. त्यामुळे प्रदर्शन रद्द करावे लागले.
- रणजित देसाई,
जिल्हा परिषद उपाध्यक्ष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT