कोकण

नापणे येथील प्रस्तावित ऊस संशोधन केंद्राच्या जागेची कृषिमंत्र्यांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी - जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज सकाळी नापणे येथील प्रस्तावित ऊस संशोधन केंद्राच्या नियोजित जागेची पाहणी केली. ही शासकीय जागा ऊस संशोधन केंद्राला देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून कोकण कृषी विद्यापीठाने रक्कम शासनाकडे भरणा केल्यानंतर या जागेचे विद्यापीठाकडे हस्तांतरण होणार आहे.

गगनबावडा तालुक्‍यातील वेसरफ येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यामुळे वैभववाडीसह कणकवली राजापूर तालुक्‍यात उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत चालले आहे. त्यामुळे कोकणातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे, तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होऊन आर्थिक प्रगती होण्यासाठी ऊस संशोधन केंद्राची गरज आहे. त्यासाठी माजी आमदार प्रमोद जठार यांनी दहा वर्षांपासून ऊस संशोधन केंद्रासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

त्यामुळे राज्य सरकारने नापणेतील सुमारे १८ एकर शासकीय जागा सरकारी दराने ऊस संशोधन केंद्राला देण्यास मंजुरी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर आलेले कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी नियोजित जागेची पाहणी केली.

या वेळी कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, तहसीलदार रामदास झळके, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी एस. डी. बागल, वेंगुर्ले कृषी संशोधन केंद्राचे सहायक संचालक डॉ. बी. एन. सावंत, फोंडाघाट कृषी संशोधन केंद्राचे डॉ. विजय शेटे, तालुका कृषी अधिकारी अमोल आगवान, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, बंड्या मांजरेकर, बबलू सावंत, किशोर जैतापकर, माजी सरपंच प्रकाश जैतापकर, उदय जैतापकर, महेश गोखले अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Commission Report : दबावाखाली अर्ज माघारी? पुण्यातील बिनविरोध निवडणुकांवर आयोगाचा रिपोर्ट कार्ड

माझ्यावर ७० हजार कोटींचे आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत, भ्रष्टाचारावर अजित पवारांचं विधान

Video Viral: पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा थरार! पोलीस पांगवण्यासाठी आल्यावर थेट राष्ट्रगीत म्हटलं, शेवटी MPSC वाले म्हणतात

Vishwas Patil : ‘शासन आणि प्रशासन हेच मायमराठीचे खऱ्या अर्थाने ‘घरचे मारेकरी’ आहेत.

India vs New Zealand 2026 ODI Squad : ३ खेळाडूंनी वाढवली अजित आगरकरची डोकेदुखी! त्यांना संघात नाही घेतलं तर काय खरं नाय...

SCROLL FOR NEXT