Alcohol parties kasal sindhudurg district 
कोकण

डोक्याला ताप...लाॅकडाउनचा असाही गैरफायदा

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - कसाल-मालवण रोडवरील श्री देव काजरोबा मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या पटांगणावर तळीरामांच्या जोरदार पार्ट्या दिवस-रात्र सुरू असल्याने या मोकळ्या जागेत दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. नशेमध्ये दारूच्या बाटल्या फोडून टाकल्यामुळे रानात गुरे चरविणाऱ्या गुराख्यांना तसेच शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तरी पोलिस प्रशासनाने संबंधित तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

गेली अनेक वर्षे, पिढ्यानपिढ्या या माळरानावर शेतकरी उदरनिर्वाहासाठी भूईमुग, नाचणी, वरईचे पीक घेत होते. हळूहळू ही शेती कमी झाल्याने त्याठिकाणी क्रिकेटचे मैदान तयार झाले; मात्र यंदा मार्चमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे दोन-चार महिन्यांमध्ये क्रिकेटपटूंनी या पटांगणावर क्रिकेट खेळणे थांबविले; मात्र त्याच जागेवर तळीरामांच्या मोठ्या पार्ट्या सुरू होऊ लागल्या. त्यामुळे पार्ट्या करून झाल्यानंतर दारूच्या बाटल्या त्याठिकाणी टाकून त्या फोडून सर्वत्र पटांगणावर काचांच्या तुकड्यांचे साम्राज्य दिसत आहे. 

गुराखींना त्रास 
गुरे चारण्यासाठी घेऊन जात असताना फोडलेल्या बाटलीच्या काचांच्या तुकड्यामधून गुराख्यांना मोठा संघर्ष करत पुढे जावे लागत आहे. शेकडोने विविध प्रकारच्या बाटल्याचे तुकडे पडल्यामुळे ते गोळा करणे जिकीरीचे आहे. त्यामुळे जनावरांच्या पायाला तसेच गुराखींच्या पायाला मोठ्या जखमा होऊ शकतात. याकडे पोलिस प्रशासनाने लवकरच निर्बंध आणावा. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने पोलिस प्रशासनाला कळविले असून त्याठिकाणी पार्ट्या करणाऱ्या तळीरामांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Adani : शरद पवार हे माझे गुरु अन् मार्गदर्शक; गौतम अदानी यांचे गौरवोदगार

Mumbai News: दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजाचे आदेश; शिक्षक संघटनाची नाराजी

पाकिस्तानी खेळाडूने भारताची जर्सी घातली, तिरंगाही खांद्यावर घेतला; देशाच्या बोर्डाकडून झाली मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : चंद्रपूर महापालिका संदर्भात नागपुरातील भाजप कार्यालयात बैठक सुरू

Healthy Resolutions 2026: 2026 मध्ये निरोगी आणि ताजेतवाने राहण्यासाठी आजच डायरीत नोट करा हे ५ सोपे पण पॉवरफुल रिझोल्यूशन्स

SCROLL FOR NEXT