Alcohol supply continues unabated at an ascending rate in mandangad okan marathi news 
कोकण

... ही तर ' देशी ' सेवा; नागरिकांनी उडवली खिल्ली...

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदमध्ये जीवनावश्यक बाबींव्यतिरिक्त सर्वच सेवा ठप्प असल्या तरी तालुक्यात तळीरामांसाठी देशी मद्य पुरवठा चढ्या दराने अखंडित सुरु असल्याची गंभीर बाब पुढे येत आहे. तालुक्यात याबाबतची चर्चा दबक्या आवाजात सुरु असून देशी मद्य विकणारे ही आपली देश सेवा आहे असे आश्चर्यजनक वक्तव्य करत असल्याची चर्चा असताना काहींनी त्यांना हि देश सेवा नसून तुमची ‘देशी सेवा’ आहे असे उत्तर देवून त्यांची खिल्ली उडवल्याचीही चर्चा आता शहरात चांगलीच रंगू लागली आहे.


 देशात टाळेबंदच्या काळात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरिता सर्वच आघाड्यांवर खबरदारी घेतली जात आहे, जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य वस्तूंची विक्री करण्यास बंधने लादली गेली आहेत. यामध्ये परमिट रूम व बिअर बार, देशी बार बंद झाली आहेत. त्यामुळे याच बाबीचा फायदा घेत तालुक्यात शहराबरोबर अनेक गावात छुप्या पद्धतीने मद्यपींना मद्य विक्री करून त्यांची गरज भागवण्यात देश सेवा आहे समजणाऱ्यांचे फावले आहे. या महाभागांकडून देशी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे कळते, विशेष म्हणजे या देशी मद्याची दुप्पटीपेक्षा अधिक चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचे बोलले जाते. पहाटे तीनच्या दरम्यान या सर्वांला वेग येत असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरिता शासनाच्या वतीने अतोनात प्रयत्न सुरु आहेत, यासाठी सर्वच यंत्रणा आपल्या जीवाची बाजी लावून काम करत असताना या मद्यविक्री करणाऱ्यांना याचे कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसते. विक्रीमागे सुशिक्षित लोकांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संतापजनक भावनाही व्यक्त होताना दिसत आहेत. या सर्व बाबींवर सबंधित प्रशासनाचा अंकुश आहे का? हा प्रश्न मात्र सामन्यांना वारंवार सतावतोय.

 टाळेबंदच्या काळात अशी कृत्ये करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, तालुक्यात टाळेबंदच्या लागू करण्यात आलेल्या सर्वच सूचनांच्या बाबतीत सबंधित प्रशासनाच्या वतीने  समाधानकारक कामगिरी करणाऱ्या प्रशासनाच्या वतीने ‘देशी सेवा’ पुरवणाऱ्यावर कारवाईचा बडगा का उगारला जात नाही हा प्रश्न सामन्यांमध्ये या निमित्ताने उपस्थित केला जात असून यापुढे यावर कारवाई होणार का हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT