रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भावात वाढ(ratnagiri corona update) होऊ नये, यासाठी जिल्ह्यात सुरू असलेले आठवडा बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत आहेत, असे आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील(collector dr. b.n. patil) यांनी जारी केले. जिल्ह्यात काही ठिकाणी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आठवडीबाजार सुरू केल्याची गंभीरबाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या निरीक्षणानंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, साथरोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये हे आदेश लागू झाले. ओमिक्रॉनमुळे अधिक धोका निर्माण झालेला आहे. या कारणास्तव शासनाने आदेशामध्ये अंशत: बदल करून सुधारित निर्बंध लावले आहेत. जिल्ह्यात तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध लागू केले होते. या निर्बंधानुसार जिल्ह्यात आठवडा बाजार सुरु करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नव्हते. तरीही अनेक ठिकाणी परवानगी न घेता आठवडा बाजार सुरू केले होते.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव यामध्ये वाढ होऊ नये व ओमिक्रॉनचा प्रसार होऊ नये, याकरीता अधिकची काळजी म्हणून काही निर्बंध लावणे आवश्यक आहेत. जिल्ह्यातील काही ठिकाणी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आठवडाबाजार सुरू केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आठवडाबाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश जारी केले.
सीईओ, गटविकास अधिकाऱ्यांवर जबाबदारी
शहरी भागात अंमलबजावणी होत आहे की नाही, याबाबत सर्व मुख्याधिकारी यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात सर्व गटविकास अधिकारी यांनी आदेश दिले आहेत. कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.