कोकण

आंबेनळी अपघातातील मृतांच्या वारसांना लाल फितीचा जाच

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ -  मागील वर्षी २८ जुलै रोजी आंबेनळी घाटात विद्यापीठाच्या बसला झालेल्या अपघातात डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील मृत्युमुखी पडलेल्या ३० कर्मचाऱ्यांपैकी २७ जणांच्या कायदेशीर वारसांना नोकरीत घेण्याच्या विशेष अनुकंपा प्रस्तावाच्या मंजुरीस शासन सकारात्मक आहे. तरी अद्याप मंत्रालयीन पातळीवर हा प्रस्ताव निर्णयाविनाच फिरत आहे.

मुख्य सचिवांकडून ही फाइल दोन दिवसांपूर्वी पुन्हा सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविल्याने हा विषय रेंगाळण्याची धास्ती निर्माण झाली आहे. याचबरोबर कर्मचारी भरती व सानुग्रह अनुदान हे दोन प्रस्तावही कृषी व वित्त विभागाकडेच पडून आहेत. अधिवेशन काळात कोकणातील लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी हे विषय तत्काळ मार्गी लावावेत, अशी अपेक्षा आहे.

आंबेनळी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ३० जणांच्या वारसांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्यात येईल, अशी आश्वासने सर्वांकडून देण्यात आली. मात्र अद्याप या विषयाला मुख्यमंत्र्यांची अंतिम मंजुरी न मिळाल्याने अन्य विभागातील टेबलांवरच ही फाइल रेंगाळली आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. 

त्यानंतर या विषयाची फाइल कृषी, वित्त विभागाकडून काही अटी शर्ती शिथिल करण्याचे मान्य करून मुख्य सचिवांकडे पाठविल्या. ही फाइल आता पुन्हा सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविली. एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे असा या प्रस्तावाचा प्रवास सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव रखडू शकतो. 

२००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत असताना मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांचे विशेष सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय आहे. त्याच निर्णयास अनुसरून अपघातात मृत्यू पावलेल्या व त्यातील २००५ नंतर सेवेत कायम झालेल्या १२ ते १३ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळावा असा प्रस्ताव २१ डिसेंबर २०१८ ला  पाठविण्यात आला आहे. तोही वित्त विभागाकडे पडून असल्याचे कळते. 

कार्यकारी परिषदेवर सदस्याकडून अपेक्षा
आमदार संजय कदम, संजय केळकर, हुस्नबानू खलिफे, राजन साळवी, निरंजन डावखरे हे कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून काम करीत आहेत. या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन या प्रस्तावांचा पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची हत्या, मुंबई पोलिसांनी १२ तासांत फरार आरोपीला केली अटक, प्रकरणाचा 'असा' लावला छडा

Crime News : मोबाईलवर बोलताय? सावधान! सटाण्यात हातातील फोन पळवणारा १९ वर्षीय चोरटा जेरबंद

Startup loan fraud case : प्रिंटिंग व्यवसाय स्टार्टअपला ५ कोटी कर्ज; ७० लाख फी घेतली, ६ परप्रांतीयांनी तरूणाला गंडवलं अन्

MP Sunetra Pawar: माळेगाव नगरपंचायतीचा सर्वांगीण विकास दिशा देणारा ठरेल: खासदार सुनेत्रा पवार, साेयीसुविधा देण्यास प्रयत्नशील!

'रोमान्सबाबत मी त्याला 10 पैकी 15 गुण देईल' राणी मुखर्जी आदित्य चोप्रा बद्दल बोलताना म्हणाली...'तो मला...'

SCROLL FOR NEXT