कोकण

आंबोली- हिरण्यकेशी आता जैविक विविधता स्थळ 

शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : सावंतवाडी तालुक्‍यातील आंबोली- हिरण्यकेशी येथील 2.11 हेक्‍टर क्षेत्रात "शिस्टुरा हिरण्यकेशी" (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीची अधिसूचना बुधवारी महसूल व वन विभागाने प्रसिद्ध केली. 

यापूर्वी शासनाने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदुर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविकविविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले. आता शिस्टुरा हिरण्यकेशीची यात भर पडली आहे. 

शिस्टुरा हिरण्यकेशी या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून, ती आंबोली- हिरण्यकेशी या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते. 
या क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे. या क्षेत्रात गवे, हरिण, बिबट, अस्वल, शेकरू, माकड, वानर, मुंगूस, साळिंदर, खवले मांजर, भेकर आदी वन्यजीव आढळून येतात. तसेच साग, आंबा, किंजळ, ऐन, जांभा, उंबर, जांभूळ, अंजन, फणस अशा वृक्षप्रजाती, झाडे, झुडपे आणि वेलींचे ही या भागात अस्तित्त्व आहे. 

वन्यजीव संशोधकांनी "क्वा' या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. संशोधनामुळे सह्याद्री विशेष करून आंबोली परिसरातील जैवविविधता आणि त्याचे महत्त्व वाढेल. जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून माशाच्या या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार आहे. अशा प्रकारे हेरिटेजचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले. शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रवीणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी लावला. या क्षेत्राला जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित व्हावे, अशी ग्रामस्थांचीही मागणी होती. 

म्हणून निर्णयाला महत्त्व
शिस्टुरा हिरण्यकेशी ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. त्यामुळे या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Pune Train : कोल्हापूर-पुणे रेल्वे प्रवास होणार तब्बल १ तास कमी, पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

'ही' मराठी अभिनेत्री होणार शेट्टींची सून ?अहान शेट्टीला डेट करत असल्याची चर्चा

Latest Marathi Breaking News Live: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली, देवभूमीचे लोक पारंपारिक ढोल-ताशांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यास उत्सुक

Pune Crime News: निलेश घायवळ टोळीतील फरार सदस्य जयेश वाघला अटक; कोथरूड गोळीबार प्रकरणात होता सहभाग

Ranji Trophy 2025: शतकवीर ध्रुवने सावरला विदर्भाचा डाव; ओडिशाविरुद्ध ३ बाद ६ वरून पहिल्या दिवसाअखेर ५ बाद २३४ धावा

SCROLL FOR NEXT