चिपी विमानतळावरील तपासणीत आढळला कोरोना बाधित sakal
कोकण

चिपी विमानतळावरील तपासणीत आढळला कोरोना बाधित

बाधित आढळला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी आज

- नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर ८ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत उतरलेल्या ९६ परदेशी प्रवाशांपैकी तपासणीत एक प्रवासी कोरोना बाधित आढळला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी आज दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर परदेशी पर्यटक उतरू लागले असून ८ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत चिपी विमानतळावर एकूण ९६ परदेशी प्रवासी उतरले. त्यापैकी ७ दिवस पूर्ण झालेल्या २५ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली. त्यापैकी सावंतवाडी तालुक्यात एका व्यक्तीचा कोरोना साठीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा संपर्कातील ७ जणांचा कोरोना तपासणीसाठी अहवाल पुणे येथे पाठविण्यात आला आहे.

नव्याने पसरणाऱ्या ओमायक्रौन या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्ह्यात दाखल होणाऱ्या परदेशी पर्यटकांची तपासणी करण्यात येत आहे. ८ डिसेंबरपासून जिल्ह्यातील चिपी विमानतळावर उतरलेल्या ९६ प्रवाशांमध्ये वैभववाडी २, कणकवली ८, देवगड १५, मालवण ५, कुडाळ १०, वेंगुर्ला १५ सावंतवाडी ३६,तर दोडामार्ग ५,असे एकूण ९६ प्रवासी दाखल झाले. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील १ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी आज दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT