Ad Anil Parab Comment On Night Life In Mumbai Ratnagiri Marathi News  
कोकण

नाईट लाईफबाबत मंत्री अनिल परब म्हणाले, 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - नाईट लाईफबाबत विरोधकांकडून शब्दच्छल केला जात आहे. शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची नाईट लाईफची संकल्पना वेगळी असून रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकतो, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी व्यक्‍त केली. 

जिल्हा नियोजनच्या बैठकीसाठी पालकमंत्री अनिल परब सोमवारी (ता. 20) रत्नागिरीत आले होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नाईट लाईफबाबत विचारले असता ते म्हणाले, मुंबईची जीवनशैली वेगळी आहे. रात्री उशिरापर्यंत येथील कामकाज सुरू असते. काही कारखाने रात्रीच्या वेळी सुरू असतात तेथील कामगारांसाठी हे नाईट लाईफ आहे. त्यांना रात्री कोणत्या गोष्टीची गरज लागली तर मॉल, हॉटेल्स किंवा तत्सम गोष्टी मिळणारी दुकाने सुरू राहिली पाहिजेत. मुंबईमध्ये रात्री वाहतूकही सुरू असते. परराज्यातून मुंबईत येणाऱ्या व्यक्तीला जेवण मिळाले पाहिजे. हे लक्षात घेऊन मुंबईत नाईट लाईफ सुरू राहावे, या उद्देशाने हा मुद्दा मांडण्यात आला होता; परंतु त्याचा विपर्यास केला जात आहे. विरोधक शब्दांमध्ये अडकून राहिले आहेत. त्याला राजकारणाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. 

मतभेद नाहीत 

किमान समान कार्यक्रमावर आधारित तीन पक्षांचे सरकार सत्तेत आहे. आमच्यामध्ये नाईटलाईफवरुन मतभेद नाहीत, असे पालकमंत्री परब यांनी स्पष्टपणे सांगितले. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: LPG सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त! पेट्रोल, डिझेल आणि CNG चेही नवे दर जाहीर

Maharashtra Loan Waiver: अद्याप २०१७ ची कर्जमाफी प्रलंबित, ६ लाख ६४ हजार शेतकरी ९ वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत

Corporators Disqualification: महाराष्ट्रात राजकीय खळबळ! 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; भाजपचे 7, एमआयएमचे 16 सदस्य रडारवर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा अपघात, तरुण गंभीर; डोक्यावर शस्त्रक्रिया

Beed ACB: सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेला अन् ४५ लाखांची लाच घेतली; वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT