any and all arrows will be examed test kokan marathi news 
कोकण

कोणतीही आणी बाणी आली तरी परिक्षा होणारच ; उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र सरकारने राज्यात 30 एप्रिल पर्यत लाॅकडाऊन जाहीर केले असले तरी सिंधुदुर्गमधील लाॅकडाऊन टप्याटप्याने शिथील केले जाईल; मात्र सीमाबंदी कायम रहाणार असल्याचे संकेत  सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत दिले आहेत .

 त्यांनी काल सायंकाळी सावंतवाडीच्या शहरात  पाहाणी केली.यावेळी  पोलीस उपाधीक्षक शिवाजी मुळीक, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शब्बीर मणियार, नगरसेवक बाबू कुडतरकर आदि उपस्थित होते.

लॉकडाऊन टप्प्या टप्याने शिथील

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे .असे असले तरी सिंधुदुर्गचे पालकमंत्री  सामंत यांनी जिल्ह्यात   लॉकडाऊन 14 नंतर टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याबाबत प्रशासनासोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील स्थिती पाहून  पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने  लाॅकडाऊन  शिथीलतेवल निर्णय घेण्याचे धोरण ठरल्याचेही त्यांनी सांगितले.  सध्या सिंधुदुर्ग जिल्हा  हा कोरोना  मुक्त आहे.यामुळे टप्प्या टप्याने ते उठवले जाईल असे ते म्हणाले. 

अफवांनवर विश्वास ठेऊ नका

विद्यापीठ परीक्षांबाबत काहि गैरसमज आहेत ;मात्र कोणतीही आणी बाणी आली तरी विद्यापीठाच्या सर्व परिक्षा होणारच आहे.याबाबत समिती नेमण्यात आली आहे.त्या समितीचा अहवाल लवकरच येईल. त्यानंतर प्रत्यक्षात लाॅकडाऊन कधी उठेल त्यानंतर परिक्षा कधी परीक्षा घ्यायच्या यांची तारीख ठरवण्यात येईल असे श्री सामंत म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT