asha workers great work konkan sindhudurg 
कोकण

कर्तव्यनिष्ठता! बाळंतपणाच्या दोन दिवस आधीपर्यंत `ती` लढली

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) -  घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याची चाहूल लागून नऊ महिने उलटले होते; पण याच काळात कोरोनाशी दोन हात करण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. आशा स्वयंसेविका असल्याने जबाबदारी खांद्यावर घेत ती घरोघरी सर्व्हेस फिरू लागली. बाळंतपणाच्या दोन दिवस आधीपर्यंत ती आपले कर्तव्य बजावत होती. श्रद्धा सुनील गावडे, असे त्या कर्तव्यनिष्ठ आशाचे नाव आहे. तुटपुंजे मानधन मिळत असले तरी त्यांनी दाखविलेल्या कर्तव्यनिष्ठेला सलामच करायला हवा. 

वागदे (ता. कणकवली) येथील आशा स्वयंसेविका सौ. श्रद्धा या कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र व वागदे उपकेंद्र यांच्या अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत 2009 पासून आशा स्वयंसेविकेचे काम पाहत आहेत. त्यांच्याकडे वागदे गावातील टेंबवाडी, डंगळवाडी, बौद्धवाडी, गावठाणवाडी व देऊळवाडी या पाच वाड्यांची जबाबदारी आहे. त्या नियमित शासनाने दिलेली विविध जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतात. आशा स्वयंसेविका या माध्यमातून जनतेची एकप्रकारे सेवाच करायला मिळाली आहे, या भावनेतून त्या सेवा बजावत असतात. 

श्रद्धा या गरोदर होत्या. त्यामुळे त्यांच्यावर स्वतः बरोबरच पोटातील बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी आली होती. मातृत्वाची घटिका भरण्याचा कालावधी जवळ येऊन ठेपला असतानाच कोरोना विषाणूने थैमान घातले. त्यामुळे श्रद्धा यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील घरोघरी जाऊन सर्दी, खोकला, ताप या कोरोना लक्षणाचा व कामानिमित्त जिल्ह्याबाहेर असलेल्या व्यक्ती गावी आल्या आहेत का? याचा सर्व्हे करण्याचे आदेश प्रशासनाचे येऊन धडकले.

आदेशानुसार श्रद्धा आपल्या कार्यक्षेत्रात त्या सर्व्हे करू लागल्या. 12 एप्रिलपर्यंत घरोघरी जाऊन श्रद्धा यांनी सर्व्हे करण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. 14 एप्रिलला त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या आरोग्याचे कारण देत ही जबाबदारी टाळू शकल्या असत्या; पण तुटपुंज्या मानधनाचे हे काम असूनही त्यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा आणि बजावलेली जबाबदारी अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. त्यांनी दाखविलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, जिल्हा परिषद प्रशासनानेही तिचे कौतुक केले आहे. त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली. माता आणि नवबालक दोन्ही सुखरूप आहेत. 

सेवा बजावता आल्याचे समाधान 
आशा स्वयंसेविका श्रद्धा गावडे यांच्याशी संवाद साधला त्या म्हणाल्या, ""मला लहानपणापासूनच जनसेवा करण्याची आवड होती. म्हणून मी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत आशा स्वयंसेविका या पदावर काम करण्यास सुरुवात केली. त्यातच सध्या कोरोनाने डोकं वर काढले आहे. आपल्या जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण नाही, ही समाधानाची बाब आहे; परंतु राज्यात विशेषतः पुणे, मुंबई या ठिकाणी रुग्ण वाढतच आहेत. देश कोरोनाशी लढा देत आहे. आपण या विरुध्द नक्कीच जिंकू, या इर्षेने मी गरोदर असताना सर्वेक्षण सुरू ठेवले होते. अशा परिस्थितीत सेवा बजावता आल्याचे समाधान वाटते..'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

CIBIL Score: तुमचा CIBIL आताच सुधारा, जर तुमचा सिबिल खराब असेल तर नोकरीही मिळणार नाही

Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल

Rain-Maharashtra Latest Live News Update: गेल्या २४ तासांत घाट क्षेत्र आणि उत्तर कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

Sickle Cell Patients in Crisis: सिकलसेल रुग्ण संकटात; डागा रुग्णालयात हायड्रॉक्सीयुरियाचा तुटवडा, उपचाराऐवजी रुग्णांना दाराबाहेर

SCROLL FOR NEXT