Matil Wale Breaks In Ratnagiri Fishing Ratnagiri Kokan Marathi News 
कोकण

बेकायदेशीर मासेमारीला बसणार आळा; मत्स्य आयुक्तालयाची न्यू ट्रिक

- राजेश शेळके

रत्नागिरी : बंदी कालावधीतील बेकायदेशीर मासेमारी (Illegal fishing) रोखण्यासाठी येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाने नामी शक्कल लढविली आहे. सध्या सर्व मासेमारी नौका बंदर (Fishing boat beach)आणि जेटीवर उभ्या आहेत. या नौकांची नावे आणि नंबर घेऊन ते कार्यालयातील विविध परवान्यांच्या नोंदींमध्ये तपासले जाणार आहे. ज्या नौकांचे नाव आणि नंबर नोंदी नसतील, अशा नौकांना शोध घेऊन कारवाई केली जाणार आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी तसे आदेश सर्व परवाना अधिकार्‍यांना दिले आहेत. त्याची कार्यवाही सुरू झाली असून बंदर आणि जेटींवरील नौकांची नावे आणि नंबर संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. assistant-fisheries-commissioner-illegal-fishing-during-the-ban-period-konkan-fishing-kokan-news

बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य विभागाने अनेक प्रयत्न केले; मात्र त्याला अपयश आले. हा विभाग गस्ती नौका नसल्याने काहीसा कमकुवत बनला आहे. या विभागाचा डोळा चुकवून बंदी कालावधीमध्ये मासेमारी केली जाते. हे रोखण्यासाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाने नवी युक्ती केली आहे. बंदरात उभ्या असलेल्या नौकांचे नाव आणि नंबर घेण्याची शक्कल लढवली आहे. या नाव आणि नंबरातील नौकांच्या नोंदी मत्स्य व्यवसाय विभागाच्या दफ्तरी नसतील त्या नौका अवैध आहेत, हे स्पष्ट होणार आहे.

सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या या नियोजनानुसार ज्या नौका अनधिकृत आढळून येणार आहेत, त्यांची माहिती मच्छीमार सहाकारी संस्थांना कळवण्यात येणार आहे. काही बेकायदेशीर नौकादेखील संस्थांच्या सदस्य असण्याची शक्यता आहे. त्या नौकांना सवलतीचे इंधन दिले जाऊ नये, असे मत्स्य व्यवसाय विभागाकडून कळवले जाणार आहे. ज्या संस्थांनी कोणत्याही अनधिकृत किंवा बेकायदेशीर नौकांना सलवतीचे डिझेल पुरविले असेल आणि त्याचा परतावा घेतला असेल तर त्या नौका मालकाला राहिलेला आणि पुढचा डिझेल परतावा दिला जाणार नाही. तशी नोटीस बजावली जाणार आहे. ज्या अनधिकृत नौका मालकांनी डिझेल परतावा यापूर्वी स्वीकारला आहे तो परत घेण्याबाबतची कारवाई केली जाणार आहे.

याची होणार पडताळणी

कोणत्याही अधिकृत मासेमारी नौकेची नोंदणी केलेली असते, त्याचा परवाना असतो. ज्या मासेमारी पद्धतीचा परवाना असतो त्याच जाळ्याने किंवा साधनांनी मासेमारी करता येते. नमुना ५ हे बंदर नोंदणीपत्र आवश्यक असते. नौकेचा विमा काढणे बंधनकारकर असते. नौकांवरील खलाशी, तांडेल यांची माहिती आवश्यक असते. या माहितीबरोबर त्या नौकांवरील खलाशी आणि तांडेलांचे ओळखपत्रसुद्धा असावे लागते. या सर्व प्रकारच्या नोंदी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडे कराव्या लागतात. त्यानुसार सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडून मासेमारीची परवानगी दिली जाते. याच सर्व नोंदी, बंदर आणि जेटींवर उभ्या असलेल्या नौकांचे नाव आणि नंबरची पडताळणी केली जाणार आहे, असे भादुले यांनी स्पष्ट केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT