Attack on Youth In Ratnagiri Marathi News 
कोकण

किरकोळ कारणावरून रत्नागिरीत तरुणावर वार 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - तालुक्‍यातील तरवळ येथे किरकोळ कारणातून तरुणावर धारदार सुरीने वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी प्रौढाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी (ता. 23) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. 

विजय गंगाराम माचिवले (53, रा. माचिवलेवाडी, तरवळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात राजेंद्र भिकाजी माचिवले (35, रा. माचिवलेवाडी तरवळ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार वाडीच्या बैठकीत विजय माचिवले याने राजेंद्र माचिवले हा गावात दारु विक्रीचा चोरटा धंदा करतो, अशी खोटी बातमी पसरवली होती.

त्याचा जाब विचारण्यासाठी राजेंद्र आला होता. या गोष्टीचा राग आल्याने विजयने त्याला प्रथम शिवीगाळ करत हातांनी मारहाण केली. त्यानंतर त्याने आपल्याजवळील सुरीने राजेंद्रच्या उजव्या हातावर आणि डाव्या पायावर सुरीने वार करून त्याला गंभीर जखमी करून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: २ कोटींची सुपारी, आरोपींसोबत धनंजय मुंडेंचा संवाद...; मनोज जरांगेंनी थेट पुराव्याच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या

Thane News: 27 गावं तरी स्वतंत्र नगर परिषद नाही, आमदार-खासदार आक्रमक; कल्याण शीळ रोडवर सर्वपक्षीय आंदोलन

Dhananjay Munde: राज्यातल्या बड्या नेत्यांच्या गाड्यांमध्ये धनंजय मुंडेंनी मोबाईल लपवले? आरोपांवर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : जकार्तामधील मशिदीत स्फोट; 50 हुन अधिकजण जखमी

Mosque Blast : 'जुमे की नमाज' सुरू असतानाच मशिदीत भीषण स्फोट; ५० पेक्षा अधिकजण जखमी

SCROLL FOR NEXT