automatic sanitizes dome in ratnagiri
automatic sanitizes dome in ratnagiri  
कोकण

रत्नागिरीत स्वंयचलित सॅनिटायझर डोम ; असे होते निर्जंतुकीकरण

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून येथील जिल्हा रुग्णालयात सॅनिटायझर डोम आणि संपर्कमुक्त स्वॅब नमुना गोळा करणार्‍या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. 


कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग अतिशय महत्वाचे आहे. तसेच रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना तसेच येथील डॉक्टर, नर्सेस आणि इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी निर्जंतुकीकरण महत्वाचे आहे. याच भूमिकेतून जिल्हाधिकार्‍यांनी मांडलेली संकल्पना साकार झाली आहे. सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर डोम उभारण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना येथील हेल्पिंग हँड्सचे कार्यकर्ते संजय वैशंपायन यांनी सांगितले, या स्वयंचलित डोमला सेन्सर बसवण्यात आलेले आहेत. यात येणारी व्यक्ती दाखल होताच निर्जंतुकीकरण द्रावणाचा फवारा सुरू होतो तो या दोन मीटरच्या कक्षातून बाहेर पडेपर्यंत तो सुरू राहतो, ज्यामुळे येणार्‍या प्रत्येक व्यक्तींचे निर्जंतुकीकरण शक्य होत आहे. 


हे पण वाचा - ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडला कोरोनाचा आणखी एक रूग्ण
जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल बोल्डे म्हणाले, सर्वसाधारण निर्जंतुकीकरणास  साबणयुक्त पाणी पुरेसे आहे. त्याचा या डोमला अविरत पुरवठा व्हावा याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. यासोबतच संशयित रुग्णांच्या घशाचा द्राव (स्वॅब) तपासणीसाठी ज्या ठिकाणी घेतला जातो, त्या ठिकाणी एका काचेच्या बंदिस्त केबिनबाहेर रबरी ग्लोव्हजच्या आधारे तपासणी नमुना गोळा करता, येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी नमुना घेतल्यानंतर लगेच जंतुनाशक फवारणी करण्यात येते. आतील बाजूस नमुना गोळा करणार्‍या डॉक्टरांना संसर्ग होऊ नये, म्हणून याच्या काचा सिलिकॉने बंदिस्त करण्यात आलेल्या आल्याने डॉक्टर पूर्णपणे सुरक्षित राहू शकतात.


सुरक्षित राहण्यास उपयुक्त सुविधा

डॉक्टर पूर्णपणे सुरक्षित राहण्यास उपयुक्त सुविधा उपलब्ध झाल्याने या रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स तसेच इतर कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची सुरक्षा होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT