bad road Adari konkan sindhudurg 
कोकण

रस्त्याची दुरवस्था सोडा, मोठ भगदाडच! कुठली ही स्थिती? वाचा सविस्तर...

दीपेश परब

वेंगुर्ले (सिधुदुर्ग) - उभादांडा-आडारी रस्त्यावर असणाऱ्या छोट्या साकव पुलावर (मूस) मोठा खड्डा पडला. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकी तसेच अवजड वाहनांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या मार्गावरील प्रवेश बंद केला आहे. पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी सदर ठिकाणी तत्काळ भेट देत हे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश बांधकाम विभागाने दिले. 

आडारी रस्त्यावर भगदाड पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येताच येथील सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा आणि सहकारी यांनी सावधगिरी म्हणून या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना त्याची जाणीव करून देत मोठ्या वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला. दरम्यान, नागरिकांसमवेत सौ. कांबळी यांनी वस्तुस्थितीची पाहणी केली आणि बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना घटनास्थळी बोलविले.

नागरीक आणि बांधकाम विभाग अभियंत्यांसमवेत चर्चा झाल्यानंतर नागरिकांच्या मागणीप्रमाणे या मुशीचे काम करण्याबाबत सभापतींनी बांधकाम अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. याठिकाणी काम करीत असताना येथील स्थानिक नागरिकांच्या उपस्थित काम करावे, अथवा स्थानिकांना त्याबाबत कल्पना देऊन हे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. यावेळी आडारी येथील सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र आडारकर, माजी ग्रामपंचायत सदस्य विश्‍वनाथ मेस्त्री, ज्ञानेश्‍वर मेस्त्री, कार्मिस आल्मेडा, गुंडू साळगावकर, राधा पेडणेकर, संजय फर्नांडिस, एल्विस आल्मेडा, सॅमसन आल्मेडा आदी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने घेतला गळफास

Ranji Trophy: जैस्वालचे अर्धशतक, मुशीर खानही लढला; पण मुंबईचा संघ पहिल्याच दिवशी गडगडला

Georai News : फार्मर आयडी नसल्याने अडकले गेवराईतील सोळा हजार शेतक-यांचे अतिवृष्टीचे अनुदान; सवा लाख शेतक-यांचे झाले होते नुकसान

Georai Crime : धुमेगाव शिवारात दोनशे किलोची गांजाची झाडे जप्त; बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

SCROLL FOR NEXT